Rajasthan Shocker:  कौटुंबिक वादातून तरुणाने वडिलांची केली हत्या नंतर 5 वर्षाच्या मुलासह तलावात उडी मारून दिला जीव
Death/ Murder Representative Image Pixabay

Rajasthan Shocker: राजस्थानच्या पाली जिल्ह्यात एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या वडिलांची हत्या केली आणि नंतर आपल्या पाच वर्षांच्या मुलासह आत्महत्या केली. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. पाली पोलीस उपअधीक्षक रत्नाराम देवासी यांनी सांगितले की, ही घटना बुधवारी रात्री कुलठाणा गावात घडली. प्रकाश पटेल (30) यांचा घटस्फोटावरून वडील दुर्गाराम पटेल (65) यांच्याशी वाद झाला. त्याने दुर्गारामचा गळा आवळून खून केला.

 त्यांनी सांगितले की, प्रकाशने नंतर त्याचा पाच वर्षांचा मुलगा राहुलसह तलावात उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी पहाटे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.