Rajastan Accident: PM Modiच्या सभेला ड्युटीसाठी निघालेल्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू,३ जखमी,राजस्थान येथील घटना
शहरातील नागौर येथे परिसरात अपघाता झाला या अपघातात पाच पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Rajastan Accident: राजस्थानमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील नागौर येथे परिसरात अपघाता झाला या अपघातात पाच पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांची कार ट्रकला धडकली. भरधाव वेगाने कार जात होती अनियंत्रित झाल्याने ट्रकला जोरदार धडक दिली असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. कारचा संपुर्ण चेंदामेंदा झाला आहे. हे सर्व पोलिस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला जात होते. दरम्यान हा भीषण अपघात झाला.या अपघातात तीन पोलिस जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिर सभेला संबोधित करणार आहेत. नागैरी जिल्ह्यातील खिंवसर पोलिस ठाण्यात कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ड्युटीसाठी निघाले होते. दरम्यान कारचा भीषण अपघात झाला. नागौर जिल्ह्यातील कनुता गावाजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रकला धडक लागल्यामुळे अपघात झाला. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
तीन जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडकलेल्या पोलिसांच्या मृतांना बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर बराच वेळ वाहतुक सेवा विस्कळीत होती. त्यानंतर पोलिसांना वाहतुक सेवा सुरळीत केली.