उत्तर प्रदेश: मुंबईहून जाणारी 3000 प्रवाशांची 'पुणे पटना ट्रेन' थांबवली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांचं स्क्रिनींग
या ट्रेनमध्ये तब्बल 3000 लोक प्रवास करत होते. या सर्व प्रवाशांची स्क्रिनींग करण्यात येत आहेत. या ट्रेनमध्ये मुंबई, पुण्याहून प्रवासी आपल्या घरी जात होते. या सर्व प्रवाश्यांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जीआरपी, आरपीएफ सहित मेडिकल पथक घटनास्थळी उपस्थित आहे.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) चंदोली स्थानकात मुंबईहून जाणारी 'पुणे पटना' ट्रेन (Pune Patna Train) थांबवण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये तब्बल 3000 लोक प्रवास करत होते. या सर्व प्रवाशांची स्क्रिनींग (Screening) करण्यात येत आहेत. या ट्रेनमध्ये मुंबई, पुण्याहून प्रवासी आपल्या घरी जात होते. या सर्व प्रवाश्यांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जीआरपी, आरपीएफ सहित मेडिकल पथक घटनास्थळी उपस्थित आहे.
आज सकाळपासून संपूर्ण देशात जनता कर्फ्यू सुरु झाला आहे. या कर्फ्यूला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज सर्वत्र दुकानं, हॉटेल्स, बससेवा, लोकल रेल्वे गाड्या बंद आहेत. करोना व्हायरसने देशात आपले पाय पसरवले आहेत. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 270 पेक्षा जास्त वाढली आहे. तसेच महाराष्ट्रात 63 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने दहशत माजवली आहे. (हेही वाचा - Coronavirus मुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत भाजप नेते निलेश राणे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीचा हात; पहा ट्विट)
दरम्यान, आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून जनतेला घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. आपला संयम आणि निर्धार या आजाराला पराभूत करील, असं मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या 130 कोटी नागरिकांना जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. आज अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. केंद्र तसेच राज्य सरकारकडून लोकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.