Shraddha Murder Case: नार्को टेस्टमध्ये आफताबच्या उत्तरांनी हैराण झालेले मानसशास्त्रज्ञ; केले अनेक धक्कादायक खुलासे

त्याने श्रद्धाच्या कपड्यांची विल्हेवाट कुठे लावली, श्रद्धाला मारताना ती काय करत होती, हेही आफताबने सांगितले.

Shraddha Murder Case (Photo Credit-Twitter/ ANI)

Shraddha Murder Case: दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात गुरुवारी झालेल्या नार्को चाचणी (Narco Test) दरम्यान आफताबने बेशुद्धावस्थेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, जी ऐकून मानसशास्त्रज्ञही (Psychologists) थक्क झाले. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, आरोपीने केवळ श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली नाही, तर हत्येनंतर कोणत्या शस्त्राने तिचे तुकडे केले हेही सांगितले. त्याने श्रद्धाच्या कपड्यांची विल्हेवाट कुठे लावली, श्रद्धाला मारताना ती काय करत होती, हेही आफताबने सांगितले.

आफताबने दिली 30 हून अधिक प्रश्नांची अचूक उत्तरे -

याशिवाय आफताबने सांगितले की, नार्को टेस्टमध्ये हत्या केल्यानंतर त्याने त्याची माहितीही कुणाला तरी शेअर केली होती. त्याला श्राद्धाचे तुकडे करण्याची कल्पना कशी सुचली. खून केल्यानंतर त्याने पहिले काय केले? त्याने मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले. कोणता तुकडा प्रथम फेकला गेला? शेवटचा तुकडा कोणता होता आणि कुठे टाकला होता? श्रद्धाचे डोके कुठे फेकले? श्रद्धाचा मोबाईल कुठे फेकला? मृतदेहाचे तुकडे फेकण्यात त्याच्या मित्रांनीही मदत केली का? आफताबला हे देखील विचारण्यात आले होते की त्याने खून केल्यानंतर किंवा आधी कोणते चित्रपट किंवा वेब सिरीज पाहिली. (हेही वाचा - Shraddha Murder Case: हत्येनंतर काही दिवसांनीचं आफताबने बनवली दुसरी गर्लफ्रेंड; भेट म्हणून दिली श्रद्धाची अंगठी)

आंबेडकर रुग्णालयात करण्यात आली चाचणी -

गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आफताबला घेऊन पोलीस आंबेडकर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. यानंतर आंबेडकर हॉस्पिटलच्या इमर्जन्सी ओटीमध्ये जाण्यापूर्वी त्याचे कपडे बदलण्यात आले. ओटीमध्ये मानसशास्त्रज्ञ, फॉरेन्सिक तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत आंबेडकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आफताबला भूल देण्याचे इंजेक्शन दिले. काही मिनिटांनी तो अर्धचेतन अवस्थेत गेला. यावेळी चार मानसशास्त्रज्ञांनी प्रत्येकी आठ प्रश्न विचारले. पॉलीग्राफ चाचणीनंतर मानसशास्त्रज्ञांच्या पथकाने तयार केलेले हे प्रश्न होते. यातील आठ प्रश्न महत्त्वाचे होते. ज्यामध्ये केवळ हत्येबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.

सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, आफताबने ही हत्या केल्याचे कबूल केले. त्याने आधी श्रद्धाला दिल्लीत आणले आणि नंतर डेटिंग अॅपवर इतर मुलींना भेटायला सुरुवात केली. त्यांना तो घरी बोलावू लागला. यामुळे श्रद्धा नाराज होती. ती पुन्हा पुन्हा भांडायची. 18 मे रोजी याच मुद्द्यावरून त्यांच्यात भांडण झाले आणि रागाच्या भरात त्याने श्रद्धाची हत्या केली. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या आफताबच्या नार्को टेस्टमध्ये आफताबने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. मानसशास्त्रज्ञ आणि पोलिसांचेही समाधान झाले. नार्को चाचणीनंतर पोलिसांच्या तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Shraddha Walker Murder Case: एकीचा मृतदेह फ्रीजमध्ये कोंबून दुसरी सोबत त्याच फ्लॅटवर डेट, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताब पूनावाला याचे धक्कादायक कृत्य उघड)

आंबेडकर रुग्णालयातील नार्को चाचणीदरम्यान आफताबला केवळ प्रश्नच विचारण्यात आले नाहीत. त्याला श्रद्धाचे फोटो, घराचे फोटो, डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेटलेल्या मुलींचे फोटोही दाखवण्यात आले. यादरम्यान त्याच्या शरीरातील हालचालीही लक्षात आल्या. सुरक्षेसाठी सिव्हिल ड्रेसमधील पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. आंबेडकर रुग्णालयात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. इमर्जन्सी ओटी असलेल्या कॉरिडॉरमध्ये सुमारे दोन डझन पोलिस कर्मचारी तैनात होते. ओटीकडे जाणारे दोन्ही रस्ते पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गेटबाहेरही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सिव्हिल ड्रेसमधील पोलिस कर्मचारी प्रत्येक कामावर लक्ष ठेवून होते. सोमवारी आफताबला घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर हल्ला झाल्यापासून पोलीस हाय अलर्टवर आहेत.