Pariksha Pe Charcha: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार 'परीक्षा पे चर्चा', विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना देणार उत्तरे

यासोबतच देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये या चर्चेचे थेट प्रक्षेपण करण्याचे निर्देशही शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत.

Prime Minister Narendra Modi (PC - Twitter)

Pariksha Pe Charcha: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) शुक्रवारी म्हणजेच आज विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha) करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना संबोधित करणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान येणाऱ्या तणावाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देतील. या संदर्भात पीएम मोदींनी ट्विट करून लिहिले आहे की, 'यंदाच्या परीक्षेवर चर्चेचा उत्साह अभूतपूर्व आहे. लाखो लोकांनी त्यांच्या मौल्यवान सूचना आणि अनुभव शेअर केले आहेत. यामध्ये योगदान देणाऱ्या सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे मी आभार मानतो. 1 एप्रिलची मी आतुरतेने वाट पाहत आहे.' पंतप्रधानांचा हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये होणार आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर मागील परीक्षांवरील चर्चेचे व्हिडिओ शेअर केले आहेत. परिक्षा पे चर्चाची ही पाचवी आवृत्ती आहे. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. परदेशातील अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या चर्चेत सहभागी होणार आहेत. (हेही वाचा - LPG Cylinder Price Hike: एलपीजी सिलिंडर आजपासून 250 रुपयांनी महागला)

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सहकारी मंत्र्यांसह गुरुवारी तालकटोरा स्टेडियमवर पोहोचून तयारीची पाहणी केली. प्रधान म्हणाले की, 'परीक्षा पे चर्चा हा एक बहुप्रतीक्षित वार्षिक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये पंतप्रधान परीक्षेच्या ताणाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देतात आणि संबंधित क्षेत्रे त्यांच्या अनोख्या आकर्षक शैलीत विद्यार्थ्यांद्वारे एका जीवंत कार्यक्रमात सादर करतात. परीक्षा पे चर्चा, ही एक सार्वजनिक चळवळ आहे.' देश कोविड-19 साथीच्या आजारातून बाहेर पडताना आणि परीक्षा ऑफलाइन मोडवर हलवण्याच्या दृष्टीने या वर्षीच्या परीक्षा पे चर्चाचे महत्त्व मंत्र्यांनी अधोरेखित केले. 21 व्या शतकातील ज्ञान अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी परीक्षा पे चर्चा सारख्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, ही एक औपचारिक संस्था बनत आहे. ज्याद्वारे पंतप्रधान थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.

विशेष म्हणजे यावेळी सुमारे 15 लाख विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. यासोबतच देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये या चर्चेचे थेट प्रक्षेपण करण्याचे निर्देशही शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत. विद्यार्थ्यांसोबत पीएम मोदींच्या 'परीक्षा पे चर्चा'ची ही पाचवी आवृत्ती आहे. यादरम्यान ते विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यानच्या तणावातून मुक्त होण्यासाठी मंत्र देताना दिसणार आहे.