पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडियावर तब्बल 109 दशलक्ष फॉलोअर्स; ट्विटरवर बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प याच्यानंतर जगात तिसरा क्रमांक

तर ट्विटर, फेसबूक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram), यावरील सगळे युजर्स मिळवून नरेंद्र मोदीचे 110.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.सध्या नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर 50 दशलक्ष फॉलोअर्सचा (Most Twitter followers) टप्पा गाठला आहे.

Barack Obama, Donald Trump And Narendra Modi (Getty Images)

भारताचे पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विटरवर (Twitter) सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत तिसरा क्रमांक मिळावला आहे. तर ट्विटर, फेसबूक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram), यावरील सगळे युजर्स मिळवून नरेंद्र मोदीचे 110.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.सध्या नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर 50 दशलक्ष फॉलोअर्सचा (Most Twitter Followers) टप्पा गाठला आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) अव्वल स्थानी आहेत. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्याकाही वर्षात नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वेगानी वाढ होत आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे आपणांस पाहायला मिळते. नरेंद्र मोदी यांना जगभरातून फॉलो केले जात आहे. जुलै महिन्याच्या शेवटी नरेंद्र मोदी यांना 43.4 दशलक्ष युजर्सने फॉलो केले होते. नरेंद्र मोदी यांनी आज 50 दशलक्षाचा टप्पा पार करत सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीतले तिसऱ्या क्रमांकाचे राजकीय नेते बनले आहेत. सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत नरेंद्र मोदी यांच्यापुढे अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा आणि सध्याचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा क्रमांक लागतो.

सध्या बराक ओबामा यांचे 108 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर डोनाल्ड ट्रम्प यांचे 64 दक्षलक्ष फॉलोअर्स आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर 30.4 दक्षलक्ष युजर्स फॉलो करत होती. फेसबूकवर नरेंद्र मोदी यांना 44.8 युजर्स फॉलो करत आहेत. त्याचबरोबर इन्स्टाग्रामवर 25 दशलक्ष युजर्स त्यांना फॉलो करत आहेत. हे देखील वाचा- अभिमानस्पद! 16 वर्षांचा प्रियव्रत पाटील ठरला 'तेनाली महापरीक्षा' पूर्ण करणारा सर्वात तरुण विद्यार्थी; पीएम नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी एक पोस्ट केली होती. त्या पोस्टला 3.7 दक्षलक्ष युजर्सने लाईक केले होते. "आज माझा खास मित्र मला भेटायला संसदेत येत आहे." अशी पोस्ट त्यांनी केली होती. डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म यांच्या अहवालानुसार, ट्विटर, फेसबूक आणि इन्स्टाग्राम यावरील सगळे युजर्स मिळवून नरेंद्र मोदीचे 110.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या यादीत नरेंद्र मोदी यांनी दुसरा क्रमांकावर आहेत, तर बराक ओबामा 182.7 फॉलोअर्ससह अव्वल स्थानी आहेत.