World's Most Popular Leader: पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते; 13 जागतिक नेत्यांच्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये ठरले अव्वल
पंतप्रधान मोदींना जगभरातील प्रौढांमध्ये सर्वोच्च रेटिंग मिळाले आहे.
World's Most Popular Leader: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली आहे. मॉर्निंग कन्सल्टने जाहीर केलेल्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये, पीएम मोदी 77 टक्के मंजुरीसह अव्वल स्थानावर आहेत. पंतप्रधान मोदींना जगभरातील प्रौढांमध्ये सर्वोच्च रेटिंग मिळाले आहे. दुसरीकडे, भाजपने ट्विट करून म्हटलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 77 टक्के जागतिक मान्यता रेटिंगसह जागतिक नेत्यांपेक्षा सर्वाधिक लोकप्रिय आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश आत्मनिर्भर भारत बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
मॉर्निंग कन्सल्ट, यूएस स्थित ग्लोबल लीडर अप्रूव्हल ट्रॅकरने जागतिक नेत्यांसाठी मान्यता रेटिंग जारी केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक रेटिंग मिळाले असून ते 77 टक्के मान्यता रेटिंगसह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते राहिले आहेत. 18 मार्च रोजी, मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने आपला नवीनतम डेटा जारी केला. त्यात म्हटले आहे की, 13 देशांच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींचे अप्रूव्हल रेटिंग सर्वोच्च आहे. यावरून पंतप्रधानांची लोकप्रियता किती उच्च आहे हे लक्षात येते. (हेही वाचा - गोव्यात सरकार स्थापनेसाठी अमित शहांच्या घरी रात्री उशिरा बैठक, जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित)
संशोधन कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात 13 जागतिक नेत्यांमध्ये PM मोदी 77 टक्के मान्यता रेटिंगसह अव्वल स्थानावर आहेत. त्यापाठोपाठ मेक्सिकोचा आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोरचा क्रमांक लागतो, ज्यांचे प्रमाण 63 टक्के आहे. इटलीच्या मारिया द्राघीला 54 टक्के मान्यता रेटिंग आहे. त्याच वेळी, जपानच्या Fumio Kishida ला 45 टक्के मान्यता रेटिंग मिळाली. पीएम मोदींचे नापसंत रेटिंग देखील सर्वात कमी 17 टक्के आहे. डेटा दर्शवितो की, जानेवारी 2020 ते मार्च 2022 पर्यंत बहुतेक महिने भारतीय पंतप्रधान सर्वात लोकप्रिय जागतिक नेते राहिले. नवीनतम मान्यता रेटिंग 9 ते 15 मार्च 2022 पर्यंत गोळा केलेल्या डेटावर आधारित आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांचे मान्यता रेटिंग सर्वात खालच्या बिंदूवर घसरले आहे. कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूमुळे आणि अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने घाईघाईने माघार घेतल्याने बिडेनची लोकप्रियता गेल्या वर्षी कमी होऊ लागली. युक्रेनचे संकट आणि देशात सध्या सुरू असलेल्या इतर समस्यांमुळे येत्या काही दिवसांत बिडेनचे अप्रूव्हल रेटिंग आणखी घसरू शकते.