Ayodhya: अयोध्येत रस्त्याच्या कडेला गर्भवती महिले दिला बाळाला जन्म; आरोग्य केंद्राचा हलगर्जीपणा, रक्ताच्या कमतरतेमुळे घडली घडना (Video)

अयोध्येत आरोग्य केंद्रांमध्ये होणारा हलगर्जीपणा पुन्हा समोर आला आहे. एका गर्भवती महिलेला रस्त्याच्या कडेला बाळंतपण करावे लागले. आरोग्य केंद्राने रक्ताच्या कमतरतेमुळा हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

Baby | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Ayodhya: अयोध्ये मध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे रुदौली येथील सामुदायिक आरोग्य केंद्राने (Health Centre) प्रवेश नाकारल्यानंतर एका गर्भवती महिलेला रस्त्याच्या कडेला बाळंतपण (Pregnant Woman Deliver baby on Road)करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, सीएचसीने तिला जिल्हा रुग्णालयात रेफर केले. परंतु ती पोहोचेपर्यंत तिला तीव्र प्रसूती वेदना होत होत्या. त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध न झाल्याने, स्थानिक महिलांनी त्यांच्या साड्या घेऊन संरक्षक मंडप तयार केले आणि रस्त्यावरच बाळंतपण करण्यास मदत केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये प्रसूतीनंतर महिलेला रस्त्याच्या कडेला पडलेले दाखवण्यात आले आहे. तर नवजात बाळाला कापडात गुंडाळून तिच्या शेजारी ठेवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement