Independence Day 2023: 'हर घर तिरंगा' मोहीमेच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनापूर्वी पोस्ट ऑफिस राष्ट्रीय ध्वजाची करणार विक्री
हा उत्साह आणि देशभक्ती चालू ठेवण्यासाठी, सरकार 13-15 ऑगस्ट, 2023 दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेचे आयोजन करत आहे.
Independence Day 2023: लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी, 'हर घर तिरंगा' मोहीम साजरी करण्यासाठी इंडिया पोस्ट आपल्या 1.6 लाख पोस्ट ऑफिसमधून राष्ट्रध्वजाची विक्री करेल, असे दळणवळण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे. भारत सरकारने 'आझादी का अमृत महोत्सव (AKAM)' च्या अंतर्गत गेल्या वर्षी 'हर घर तिरंगा' मोहीम सुरू केली. 2022 मध्ये या मोहिमेला प्रचंड यश मिळाले. या मोहीमेअंतर्गत 23 कोटी कुटुंबांनी त्यांच्या घरी तिरंगा फडकावला आणि HGT वेबसाइटवर सहा कोटी लोकांनी सेल्फी अपलोड केले.
पोस्ट विभागाने (DoP) ही मोहीम शेवटच्या टप्प्यापर्यंत नेली असून देशाच्या दुर्गम कोपऱ्यात राष्ट्रध्वजाची उपलब्धता सुनिश्चित केली, असेही यात म्हटले आहे. हा उत्साह आणि देशभक्ती चालू ठेवण्यासाठी, सरकार 13-15 ऑगस्ट, 2023 दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेचे आयोजन करत आहे. (हेही वाचा -PM Modi: पक्की घरे मिळालेल्या माता-भगिनींची पत्रे मिळाल्याने भारावून गेलो; दिल्लीतील कालकाजीच्या महिलांनी लिहिलेल्या पत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला भावना)
पोस्ट विभागाअंतर्गत देशातील 1.6 लाख पोस्ट ऑफिसच्या विशाल भौतिक नेटवर्कचा लाभ घेण्याचे आणि झेंड्यांची विक्री सुनिश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सर्व पोस्ट ऑफिसमधून ही मोहीम सुरू करण्यात आल्याचही निवेदनात सांगण्यात आलं आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये ध्वजांची विक्री लवकरच सुरू होईल आणि नागरिक ध्वज खरेदी करण्यासाठी त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ शकतात, असे त्यात म्हटले आहे. नागरिक विभागाच्या ePostOffice सुविधेद्वारे (www.epostoffice.gov.in) राष्ट्रध्वज खरेदी करू शकतील.
नागरिकांना या कार्यक्रमाशी जोडण्यासाठी पोस्ट ऑफिस अनेक जागरूकता उपक्रम आयोजित करेल. नागरिक या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात आणि न्यू इंडियाच्या या महान उपक्रमाचा एक भाग बनू शकतात, असेही निवेदनात म्हटलं आहे.