Karnataka Politics: महाराष्ट्रातील राजकीय नाट्यानंतर कर्नाटकात खळबळ? माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणतात 'इथेही अजित पवार तयार होऊ शकतो'

एच डी कुमारस्वामी यांच्या अंदाजानुसार वर्षअखेरीस किंवा लोकसभा निवडणूकांनंतर कर्नाटकातही सत्तांतराची शक्यता आहे.

कुमारस्वामी | Twitter

महाराष्ट्राला मागील साडेतीन वर्षात 3 मोठे राजकीय धक्के बसले आहेत. वर्षभरापूर्वी सत्तांतर झाल्यानंतर आता अजित पवार शरद पवारांना दूर सारून सत्तेमध्ये सहभागी झाले आहे. महाराष्ट्रातील या सत्तांतराच्या घडामोडीचा धसका महाराष्ट्राबाहेर बिगर भाजपा सरकारांनीही घेतला आहे. बिहार पाठोपाठ आता कर्नाटकातही राजकीय घडामोडींवर अनेकांचे लक्ष आहे. कर्नाटकात जेडीएस नेता एच डी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांच्या वक्तव्याने देखील आता खळबळ माजली आहे. माजी मुख्यमंत्री कुमारसवामी यांनी 'येत्या काळात काहीही होऊ शकतं. कर्नाटकातही कोणी 'अजित पवार' समोर येऊ शकतं' असं म्हटलं आहे. वर्षाअखेरीस किंवा लोकसभा निवडणूकांनंतर या घडामोडींनी वेग घेतला जाऊ शकतो असं ते म्हणाले आहेत.

कुमारस्वामींनी कुणाचेही थेट नाव घेतलेले नाही पण त्यांचा अप्रत्यक्ष इशारा

डीके शिवकुमार यांच्याकडे असू शकतो. कर्नाटकात काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकांनंतर कॉंग्रेसने नवा मुख्यमंत्री कोण? यावरून बराच वेळ घेतला. डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची आशा असताना त्यांना सबुरीची भूमिका घेण्याचा सल्ला देत सिद्धारमैया यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यानंतर या दोघांमध्ये तणावाच्या संबंधांची चर्चा रंगली. कॉंग्रेसने डीकेंना उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी केलं.

एच. डी. कुमारस्वामी यांची भविष्यवाणी

BS Yediyurappa यांची प्रतिक्रिया

बीएस येडियुरप्पा यांनी त्यांच्या विधानानंतर लगेचच माध्यमांमध्ये आणखी एक विधान केले ज्यामुळे भाजप आणि जेडीएस यांच्यातील युतीच्या अटकळांना बळ मिळाले. त्यांनी स्पष्ट केले की, "आमच्या केंद्रीय नेतृत्वाने परवानगी दिली तरच मी एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत कर्नाटकातील भ्रष्ट काँग्रेस सरकारविरोधात लढण्यास तयार आहे."