उद्या दिल्लीत भाजपची यूपी निवडणुकीच्या निकालाबाबत दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्वतंत्र देव सिंह आणि संघटन मंत्री सुनील बन्सल उपस्थित राहणार आहेत.
युक्रेन-रशिया युद्धानंतरचे परिणाम प्रत्येक देशाला भोगावे लागतील. युद्धात लढणाऱ्या राष्ट्रांशी भारताचे आर्थिक, संरक्षण, सुरक्षा, राजकीय संबंध आहेत. जगभरात कोळसा, गॅस, खतांच्या आंतरराष्ट्रीय किमती झपाट्याने वाढत आहेत, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
हे दुर्दैव आहे की हजारो भारतीय विद्यार्थी, भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले असताना देशाचे मनोधैर्य खचल्याची चर्चा होती. या लोकांनी #OperationGanga ला बदनाम करण्याचाही प्रयत्न केला. भारताच्या भविष्यासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे, असंही पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.
सीमावर्ती राज्य असल्याने, पंजाबला फुटीरतावादी राजकारणापासून सावध ठेवण्याचे काम भाजप कार्यकर्ता करत राहील. येत्या 5 वर्षात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता तिथे ही जबाबदारी पार पाडेल. हा माझा विश्वास आहे.
पीएम मोदी म्हणाले की, आज मी पंजाबमधील भाजप कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करेन. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पक्षाचा झेंडा ज्या प्रकारे उंचावला आहे, त्यामुळे आगामी काळात ते पंजाबमध्ये भाजपची ताकद आणि देशाची ताकद एक महत्त्वाचे स्थान म्हणून विकसित करतील.
जेव्हा आम्ही 2019 मध्ये (केंद्रात) सरकार स्थापन केले तेव्हा तज्ञांनी अनेक अंदाज वर्तवले. मला विश्वास आहे की, तेच 'तज्ञ' म्हणतील की, 2022 च्या निवडणुकीचे निकाल 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांचे भवितव्य ठरवतील.
गोव्यात सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध झाले आहेत. उत्तराखंडमध्ये भाजपने नवा इतिहास रचला आहे. राज्यात प्रथमच एखादा पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आला आहे. 5 राज्यांतील विधानसभा निकालांवर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
10 मार्चपासून होळी सुरू होईल असे आम्ही आधीचं सांगितले होते. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन भाजपचा विजय सुनिश्चित केल्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो. उत्तर प्रदेसमध्ये प्रथमचं, दुसऱ्या टर्मसाठी मुख्यमंत्री निवडला जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.
भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष JP Nadda दिल्लीमध्ये भाजपा मुख्यालय मध्ये पोहचले आहेत. पाच पैकी चार राज्यांत भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या तयारी मध्ये आहेत.
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते Amit Shah यांच्याकडून उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे यावेळी त्यांच्यावर विश्वास दाखवलेल्या मतदारांचेही आभार मानले आहेत.
UP CM Yogi Adityanath लखनौ मध्ये भाजपा कार्यालयात दाखल झाले आहेत. गोरखपूर मधून जिंकल्यानंतर त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली आहे.
गोवा मध्ये कॉंग्रेसच्या परफॉर्मन्सवर पी चिदंबरम यांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, भाजपाव्यतिरिक्त झालेलं मतदान इतर पक्षांमध्ये विभागलं गेल्याने कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार विजयापासून दूर राहिले. अनेक ठिकाणी थोड्या फरकाने पराभव झाल्याचं त्यांनी म्ह्टलं आहे.
गोवा मध्ये कॉंग्रेसच्या परफॉर्मन्सवर पी चिदंबरम यांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, भाजपाव्यतिरिक्त झालेलं मतदान इतर पक्षांमध्ये विभागलं गेल्याने कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार विजयापासून दूर राहिले. अनेक ठिकाणी थोड्या फरकाने पराभव झाल्याचं त्यांनी म्ह्टलं आहे.
Goa CM Pramod Sawant यांनी भाजपाच्या सत्तास्थापनाचा दावा केला आहे. गोव्यात भाजपाचा 20 जागी विजय पक्का आहे तर 3 जणांनी पाठिंबा दर्शवल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब मध्ये मागील महिन्याभरापासून सुरू असलेली मतदानाची रणधुमाळी 7 मार्चला थांबली आहे. आता आज (10 मार्च) जाहीर होणार्या निवडणूक निकालाकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. एकूण 690 विधानसभा जागांवर आज निकाल जाहीर होणार आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार उत्तराखंड आणि गोवा मध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश मध्ये भाजपा पुन्हा सत्ता राखण्याचा अंदाज आहे. तर पंजाब मध्ये आप मुसंडी मारणार असल्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात 7 टप्प्यांमध्ये 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारी आणि 3,7 मार्च दिवशी निवडणूक झाली. गोव्यात 14 फेब्रुवारीला गोवा, उत्तराखंड मध्ये प्रत्येकी 40 आणि 70 जागांवर निवडणूक आहे. उत्तराखंड मध्ये 117 जागांवर निवडणूका झाल्या आहेत त्याचे निकाल आज लागतील. मणिपूर मध्ये 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च दिवशी निवडणूक पार पडली आहे.
2017 मध्ये गोव्यात काँग्रेसला सर्वाधिक 17 जागा असतानाही तिथे भाजप सरकार बनवण्यात यश आलं होतं. मणिपूरमध्येही भाजपने सत्ता स्थापनेत काँग्रेसवर मात केली होती. तर उत्तर प्रदेशामध्ये भाजपाने सत्ता मिळवली होती. उत्तर प्रदेश विधानसभेत 403 जागा असून पक्षांना बहुमतासाठी 202 सदस्यांचे संख्याबळ लागेल. ७० जागांच्या उत्तराखंडमध्ये बहुमतासाठी 36 जागा जिंकाव्या लागतील. पंजाबमध्ये 117 जागा असून बहुमतासाठी 59 सदस्य विजयी व्हावे लागतील. गोवा विधानसभेत 40 जागा असून बहुमतासाठी 21 जागा जिंकाव्या लागतील. मणिपूरमध्ये 60 जागा असून बहुमतासाठी 31 सदस्यांचे संख्याबळ गरजेचे आहे.