Maharashtra Student Protest: दहावी आणि बारावीच्या ऑनलाइन परीक्षांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे राज्यभर आंदोलन, विद्यार्थाच्या आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊ?

यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कुणाचं नेतृत्त्व आहे? या विद्यार्थ्यांना कोण भडकवतंय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Maharashtra Student Protest (संग्रहित संपादित प्रतिमा)

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले की इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षा ऑफलाईन पध्दतीने घेतल्या जातील मात्र या निर्णयानंतर राज्यातील विद्यार्थानं मध्ये संताप पाहायला मिळत आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेतल्या जाव्या या मागणीसाठी विद्यार्थी राज्यभर रस्त्यावर उतरले आहे. तसेच या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, ऑफलाइन परीक्षांना विरोध करण्यासाठी मुले रस्त्यावर उतरल्याने कोरोना नियमांची पायमल्ली करताना दिसत आहे. परीक्षा ऑनलाईनच पद्धतीने घ्यावी यासाठी औंरगाबाद, उस्मानाबाद, नागपुर, अकोला, पुणे या जिल्ह्यात मुंलानी आंदोलन केले आहे. मुंबईतील धारावी येथे मोठ्या संख्येने शाळकरी मुले जमली होती. या मागणीसाठी, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कुणाचं नेतृत्त्व आहे?  या विद्यार्थ्यांना कोण भडकवतंय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

विद्यार्थाच्या आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊ?

हिंदुस्थानी भाऊचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे. तसेच हिंदुस्थान भाऊ आपल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थीने भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आहे असे म्हटले जात आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच विद्यार्थ्यांची परीक्षा घ्या, असं आवाहन हिंदुस्थानी भाऊने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना केलं आहे. मला तरुण वर्ग फॉलो करत आणि तरुण वर्गासाठी मी लढतो, त्यांच्यासाठी आयुष्यभर लढणार असं हिंदुस्थानी भाऊने म्हटलं आहे. (हे ही वाचा Maharashtra Student Protest: शिक्षणमंत्री Varsha Gaikwad यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन; पोलिसांचा लाठीचार्ज)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hindustani bhau (@hindustanibhausarkar)

परीक्षेसाठी शिक्षणविभाग परिपूर्ण - बच्चु कडू

शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की काही विद्यार्थी रस्त्यावर आले म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं मत असं नाही तसंच यात काही चूकीचे लोकही असतील असं मतही त्यांनी दिलं आहे. तसंच या सर्वाची चौकशी केली जाईल आणि आंदोलनातील मागण्यांवर चर्चाही केली जाईल असं बच्चु कडू यांनी म्हटलं आहे. या आंदोलनातील मागण्यांवर चर्चा केली जाईल. तसंच परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन हे ठरवण्यासाठी कोणालाही सल्ला द्यायची गरज नाही. हे निर्णय घेण्यासाठी शिक्षणविभाग परिपूर्ण असल्यांचही बच्चू कडू म्हणाले.