Sonia Doohan यांनी अजित पवारांसोबत जाण्याचे वृत्त फेटाळलं पण खुलासा करताना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलून दाखवली 'ही' मोठी नाराजी !
त्यांची साथ अजून सोडलेली नाही. पण भविष्यात पक्ष सोडल्यास आपण अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत
एनसीपी मधील फुटीनंतर आता शरद पवार (Sharad Pawar) विरूद्ध अजित पवार (Ajit Pawar) असा पक्ष विभागला गेल्यानंतर अनेकजण शरद पवारांवरील निष्ठेमुळे त्यांच्यासोबत राहिले आहेत पण पक्षाची जबाबदारी सध्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) सांभाळत असताना त्यांच्या नाराजी बोलून काहींनी पक्षाला रामराम ठोकला आहे. अशातच समोर आलेलं नाव म्हणजे सोनिया दुहान (Sonia Doohan). सोनिया अजित पवारांच्या पक्षात जाणार अशा चर्चा असताना त्यांनी आज मीडीया समोर येउन खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी 'शरद पवारांची मुलगी म्हणून आपण त्यांचा सन्मान करतो पण सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. त्यांच्या जवळील काही व्यक्ती पक्षातील नेत्यांना संपवण्याचं काम करत असल्याचा' खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. Maharashtra Politics: बनावट ओळखपत्र प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या सोनिया दुहान यांना गोवा न्यायालयाकडून जामीन मंजूर .
सोनिया दुहान अजित पवारांच्या पक्षात जाणार का? असा प्रश्न विचारताच त्यांनी आपण अजूनही शरद पवारांसोबत आहोत. त्यांची साथ अजून सोडलेली नाही. पण भविष्यात पक्ष सोडल्यास आपण अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत. धीरज शर्मांसारखे सर्वच लोक शरद पवारांना का सोडत आहेत? मी आणि धीरज शर्मा आमच्यासाठी शरद पवारच आमचे लीडर आहेत. शरद पवार आमचे नेते होते, आहेत आणि यापुढेही राहतील." असेही त्यांनी सांगितलं आहे.
सोनिया दुहान यांच्यावर एनसीपीच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्या आहेत. तरूण आणि धडाडीचं नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. त्या पक्षाच्या प्रवक्त्या देखील आहेत. 2019 मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची 'पहाटेची शपथ' घेतली तेव्हा त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांना पुन्हा मागे घेऊन येण्यात सोनिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हा पासून त्या प्रकाशझोकात आल्या आहेत.