'हिंदु-फोबिक' सामग्रीवरून Netflix विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याच्या वृत्ताचे शिवसेनेने Fake News म्हणत केले खंडन
शिवसेनाने याबाबाद स्पष्टीकरण देत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी या सर्व वृत्तांना चुकीचे म्हटले आहे. नेटफ्लिक्स ही एक अमेरिकन कंपनी आहे. मागील कित्येक वर्षांत ती मनोरंजन क्षेत्रात भारतात खूप लोकप्रिय झाली आहे.
शिवसेना (Shiv Sena) आयटी सेलच्या सदस्याने अमेरिकन ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रमेश सोलंकी (Ramesh Solanki) नावाच्या या शिवसेनेच्या सदस्याने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की नेटफ्लिक्स आपल्या आशयाने हिंदू आणि भारताची प्रतिमा खराब करीत आहे. नेटफ्लिक्सवर अलीकडेच रिलीझ झालेला सेक्रेड गेम्स (Sacred Games), लैला (Laila), घोउल (Ghoul) या वेबसिरीज असो किंवा हसन मिन्हाज (Hasan Minhaj) यासारख्या कलाकारांचे स्टॅन्ड अप कॉमेडीचा शोज असो, प्रत्येक माध्यमातून हिंदूंना निशाणा बनवले जात आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर भारत आणि हिंदूंविषयीची प्रतिमा मालिन होत आहे असाही आरोप सोलंकी यांनीही लगावला आहे. (NETFLIX मुळे हिंदूची बदनामी होत असल्याचा आरोप लगावत शिवसेनेच्या रमेश सोलंकी यांची पोलिसात धाव)
दरम्यान, शिवसेनाने याबाबाद स्पष्टीकरण देत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी या सर्व वृत्तांना चुकीचे म्हटले आहे. शिवसेना कम्युनिकेशनने त्यांच्या ट्विटवर याबाबत माहिती देत लिहिले की, "शिवसेना पक्षाने नेटफ्लिक्स इंडियाविरुद्ध आशयाची तक्रार नोंदविली आहे ही बातमी खोटी आहे. सर्वांना विनंती आहे की जनतेची दिशाभूल करणार्या चुकीच्या बातम्या छापण्यापूर्वी आमच्या अधिकृत प्रतिनिधींकडून याची पुष्टी करावी."
मुंबईच्या एलटी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत सोलंकी यांनी नेटफ्लिक्सवर 'सेक्रेड गेम्स', 'लैला' आणि 'घोल' यासह स्टँडअप कॉमेडियन हसन मिन्हाज यांच्या शोचा हवाला देत जगभरातील हिंदूंच्या विरोधात प्रचाराचा प्रचार केल्याचा आरोप केला आहे. नेटफ्लिक्स ही एक अमेरिकन कंपनी आहे. मागील कित्येक वर्षांत ती मनोरंजन क्षेत्रात भारतात खूप लोकप्रिय झाली आहे. बर्याच वेब सीरीजमुळे बहुतेक लोकांना नेटफ्लिक्स माहित असते. तथापि, हे विवादांशी देखील संबंधित आहे.