'अब हारना और डरना मना है' पाहा संजय राऊत यांचे नवे ट्वीट
तसेच राजकारणातील हालचालींचा वेग वाढला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सतत आपापसात समन्वय निर्माण करण्यासाठी विचारमंथन करत आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. तसेच राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सतत आपापसात समन्वय निर्माण करण्यासाठी विचारमंथन करत आहेत. यातच शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sajay Raut) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांनी 'अब हारना और डरना मना है' असे ट्विट करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर राष्ट्रपती राजवटीमुळे भाजपला सर्वाधिक नुसकान झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा म्हणाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरू झालेल्या सत्तास्थापनेच्या राजकीय रणधुमाळीत सुरुवातीपासूनच राऊत हे केंद्रस्थानी आहेत. ठरल्याप्रमाणे सत्तावाटप होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राऊत हे रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन भाजपवर हल्ले चढवत आहेत. त्यांच्या या धडाक्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण गेले काही दिवस चांगलेच तापले होते. आता भाजपशी जवळपास काडीमोड झाल्यानंतर राऊत यांनी ट्विटर हल्ले सुरू केले आहेत. हे देखील वाचा- उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांची कोणतीही बैठक झाली नाही; पसरलेल्या अफवेवर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
संजय राऊत यांचे ट्विट-
सामना वृताच्या आग्रलेखानुसार, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट अजिबात मान्य होणार नाही, ती त्वरित मागे घ्यावी. काही लोक महाराष्ट्राच्या भावनेशी खेळू इच्छितात पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, महाराष्ट्राच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा स्वत:च संपून जाल असा इशारा सामानाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.