Rajya Sabha Election 2020: राजस्थान काँग्रेस सतर्क, आमदार रिसॉर्टवर; आमदारांना भाजपकडून 25 कोटीची ऑफर; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा आरोप

त्यानंतर गहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अशोक गहलोत यांनी म्हटले आहे की, पक्षाने फाटाफूट रोखण्यासाठी आपले आणि अपक्ष आमदार रिसॉर्टवर पाठवले आहेत.

Chief Minister Ashok Gehlot | (Photo Credits-ANI)

राज्यसभा निवडणूक 2020 (Rajya Sabha Election 2020) येत्या 19 जूनला पार पडत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थान काँग्रेस (Rajasthan Congress) सतर्क झाली असून, पक्षाने आपले आमदार रिसॉर्टवर ठेल्याचे वृत्त आहे. अटीतटीच्या निवडणुकीत ऐनवेळी पक्षातील आमदार आणि सरकारला पाठिंबा देत असलेले आमदार फटू नये यासाठी पक्ष काळजी घेत असल्याचे आयएनएसने आपल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Chief Minister Ashok Gehlot) यांनी आरोप केला आहे की, भाजपने काँग्रेस आमदारांना 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. राजधानी दिल्ली येथील राजमार्क येथील एका हॉटेलमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या समविचारी आमदारांची एक बैठक पार पडली. त्यानंतर गहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अशोक गहलोत यांनी म्हटले आहे की, पक्षाने फाटाफूट रोखण्यासाठी आपले आणि अपक्ष आमदार रिसॉर्टवर पाठवले आहेत.

राजस्थानमध्ये 19 जूनला राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान पार पडणार आहे. राजस्थानमधून काँग्रेसने दोन उमेदवार दिले आहेत. त्यापैकी एक आहेत के.सी. वेणुगोपाल आणि दुसरे आहेत नीरज डांगी. दुसऱ्या बाजूला भाजपनेही दोन उमेदवार दिले आहेत. त्यापैकी एक आहेत ओमकार सिंह लखावत आणि दुसरे आहेत राजेंद्र गहलोत. उमेदवार तुल्यबळ असल्याने इथे सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी नवे चेहरे की जुन्यांनाच संधी? राज्यभाल भगत सिंह कोश्यारी यांची भूमिका महत्त्वाची)

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला हे परिस्थिती समजावून घेण्यासाठी आणि काँग्रेस आमदरांची एकजूट कायम ठेवण्यासाठी बुधवारीच जयपूरला पोहोचले आहेत. ज्या रिसॉर्टमध्ये काँग्रेस आणि अपक्ष आमदार ठेवले आहेत त्या सर्व आमदारांची एकूण संख्या 90 इतकी आहे. आयएनएसने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त देत म्हटले आहे की, या 90 आमदारांना आणखीही काही आमदार येऊन मिळणार आहेत.