Rahul Gandhi: गुजरातमध्ये कॉंग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना मोफत वीजेसह 3 लाखांपर्यत कर्जमाफी, गुजरात विधानसभा निवडणुकीचा वेध घेत राहुल गांधींनी दंड थोपटले
गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाच सरकार येईल असा विश्वास राहुल गांधीनी दर्शवला आहे.
काल कॉंग्रेसने (Congress) महागाविरोधात (Inflation) रॅली काढत केंद्र सरकारला (Central Government) धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. आज खुद्द राहुल गांधींनी (Rahul Gandhi) थेट गुजरातमध्ये (Gujarat) सभा घेत भाजपला गुजरात विधानसभा निवडणुकीचा (Gujarat Vidha Sabha Election) वेध घेत भाजपला आवाहन केले आहे. गुजरातमध्ये (Gujarat) कॉंग्रेसची (Congress) सत्ता आल्यास COVID दरम्यान मृत्यू झालेल्यांना कुटुंबीयांना 4 लाख रुपये भरपाई तर शेतकऱ्यांना मोफत वीज (Free Electricity) आणि सर्वसामान्य ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज देण्याचं आश्वासन कॉंग्रेस नेते राहुल गांधीनी (Congress Leader Rahul Gandhi) केलं आहे. तसेच मला बेरोजगारी (Unemployment) संपवायची आहे. गुजरातमधील (Gujarat) 10 लाख तरुणांना रोजगार द्यायचा आहे. म्हणून गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाच सरकार येईल असा विश्वास राहुल गांधीनी दर्शवला आहे.
तसेच कॉंग्रेसचं (Congress) सरकार आल्यास गुजरामध्ये 3000 इंग्रजी माध्यमाच्या शाळा (English Medium School) उघडून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण (Free Education) देण्याची घोषणा राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केली आहे. एवढचं नाही तर दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान, 1000 रुपयांना विकले जाणारे गॅस सिलिंडर (Gas Cylinder) 500 रुपयांना, शेतकऱ्यांना 3 लखांपर्यतची कर्जमाफी अशा विविध मोठी आश्वासन देत कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुजरातमधील (Gujarat) जनतेला संबोधित केले.
तसेच गुजरातमधील (Gujarat) अवैध ड्रग्ज (Drugs) विक्रीच्या मुद्यावरुन राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) हल्लाबोल केला. राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले गुजरात (Gujarat) हे ड्रग्जचे केंद्र बनले आहे. मुंद्रा बंदरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जची आयात निर्यात (Drugs Import Export) केली जाते पण गुजरात सरकार (Gujarat Government) कोणतीही कारवाई करत नाही.हे गुजरातचे मॉडेल (Gujarat Model) आहे का असा सवाल विचारत राहुल गांधीनी (Rahul Gandhi) गुजरात सरकारवर निशाणा साधला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)