Punjab Elections Results 2022: पंजाबमध्ये AAP ने मारली बाजी, काँग्रेसचा पत्ता कट; हे मुद्दे ठरले निर्णायक

पण कोणकोणते घटक होते ज्यांच्यामुळे 70 वर्षे जुन्या पक्षाचा पंजाबमधून पत्ता कट झाला. या दोन्ही पक्षांची गेल्या सात दशकांपासून राज्यात सत्ता गाजवली आहे. पण आता हे चित्र बदलले आहे आणि एक नवीन पक्ष सत्ता स्थानपण करण्यासाठी सज्ज आहे.

अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान (Photo Credit: Twitter)

Punjab Elections Results 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election) आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) स्वीप करण्यासाठी सज्ज आहे. पण कोणकोणते घटक होते ज्यांच्यामुळे 70 वर्षे जुन्या पक्षाचा पंजाब (Punjab) मधून पत्ता कट झाला. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार पंजाब विधानसभेत आम आदमी पक्ष 117 पैकी 89 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस (Congress) आतापर्यंत 15 जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल (Shiromani Akali Dal) या दोन पारंपरिक पक्षांच्या दारूण पराभवाची कारणे काय आहेत? या दोन्ही पक्षांची गेल्या सात दशकांपासून राज्यात सत्ता गाजवली आहे. पण आता हे चित्र बदलले आहे आणि एक नवीन पक्ष सत्ता स्थानपण करण्यासाठी सज्ज आहे. (Assembly Election Results 2022: उत्तर प्रदेश, गोवा राज्यांमध्ये शिवसेनेला मोठा झटका, अनेक ठिकाणी उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते)

1. भगवंत मान

2017 विधानसभा निवडणुकीत AAP ने पंजाबमधील 112 पैकी 20 जागा जिंकल्या, पण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न केल्याबद्दल पक्षाला टीकेचा सामना करावा लागला. पंजाबचे मुख्यमंत्री होण्याची अरविंद केजरीवाल यांची स्वतःची महत्त्वाकांक्षा हे या निर्णयामागील कारण असल्याचा आरोप करण्यात आला. तथापि, 2022 मध्ये संगरूरचे खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करून AAP अधिक चांगल्या प्रकारे तयार केली होती. पक्षाचा लोकप्रिय शीख चेहरा मान, मालवा भागात खूप लोकप्रिय आहे.

2. काँग्रेसने स्वतः ओढवलेले संकट

सप्टेंबर 2021 मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पक्षाच्या मोठ्या पदावरून हटवल्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली. नेतृत्वाच्या संकटापासून ते नवजोत सिंह सिद्धू, चरणजित सिंह चन्नी आणि सुनील जाखड यांच्यातील पदासाठीच्या भांडणाने पक्षाच्या डोकेदुखीत आणखी वाढ केली. काँग्रेसमधील कलहामुळे मतदारांचा भ्रमनिरास झाला.

3. शेतकऱ्यांच्या निषेधाचा परिणाम

वर्षभर चाललेला शेतकऱ्यांचा निषेध पंजाब निवडणुकीसाठी सर्वात निर्णायक घटकांपैकी एक ठरला. अशा परिस्थितीत एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निषेधाची भावना होती, तर काँग्रेसला या भावनेचे फायदा घेता आले नाही.

4. पंजाब बदलासाठी आतुर

पंजाबमध्ये परंपरागतपणे शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेस यांची सत्ता राहिली आहे. या दोन्ही पक्षांनी पंजाबमध्ये अनेक दशके सत्ता गाजवली आहे, मात्र यंदा काँग्रेसने राजकीयदृष्ट्या कट्टर प्रतिस्पर्धी अकाली विरोधात मवाळ भूमिका घेतली. चन्नी यांच्या पूर्वी राज्यातील कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारवर बादल यांच्यावरील आरोपांना नरमाईने हाताळण्याचा आरोप करण्यात आला होता, त्यामुळे काँग्रेस आणि अकाली एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आभास निर्माण झाला, जो की या दोन्ही पक्षांच्या विरोधात जाणारा मुद्दा ठरला.

5. दिल्ली मॉडेल

आम आदमी पार्टी प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मॉडेल पंजाबमधील लोकांसमोर ठेवले. परवडणाऱ्या दरात दर्जेदार सरकारी शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या दिल्ली गव्हर्नन्स मॉडेलच्या चार स्तंभांवर त्यांनी लोकांना आश्वासने दिली. पंजाब हे एक असे राज्य आहे जे उच्च वीज दरांशी लढा देत आहे आणि जिथे आरोग्य व शिक्षणाचे बहुतांश खाजगीकरण झाले आहे. अशा परिस्थितीत आता पंजाबच्या नागरिकांनी केजरीवालांचे दिल्ली मॉडेलला मान्यता देण्याचा कौल दिला आहे.