Nawab Malik Arrested: नवाब मलिक यांच्या अटकेवरून उद्या माविआचे निदर्शने, भाजपही राजीनाम्यासाठी आंदोलन करण्याची शक्यता

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा समावेश आहे.

Nawab Malik | (Photo Credit - Twitter)

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना विशेष न्यायालयाने 3 मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालय (ED) कोठडीत पाठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, (NCP) शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसने (Congress) हा राजीनामा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी ईडीच्या (ED) कारवाईदरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बैठक बोलावली होती. बैठकीनंतर मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbhal) यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा फेटाळून लावला. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी कोणतीही चूक केली नसल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे भुजबळ म्हणाले.

मलिक यांच्या अटकेचा निषेध करताना भुजबळ म्हणाले की, आमच्या पक्षाच्या नेत्याला मलिक यांना "सत्तेचा गैरवापर" केल्याबद्दल केंद्रावर केलेल्या स्पष्टवक्ते टीकेसाठी लक्ष्य करण्यात आले आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री मलिक यांच्या अटकेविरोधात गुरुवारी सकाळी आंदोलन करणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा समावेश आहे. (हे ही वाचा Devendra Fadnavis On Nawab Malik: नवाब मलिकच्या अटकेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या शत्रूला मदत करणार्‍यांची गय केली जाऊ नये)

राजीनाम्याच्या मागणीवर भाजप ठाम

त्याचवेळी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप ठाम आहे. भाजपने गुरुवारी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. मलिकच्या अटकेनंतर महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली. “एखाद्या मंत्र्यावर फौजदारी आरोप असल्यास त्याला त्याच्या पदावरून काढून टाकण्यात यावे, असा कायदा आहे. मलिक यांना हटवायला हवे किंवा पायउतार होण्यास सांगितले पाहिजे.

महाराष्ट्राच्या दोन मुख्यमंत्र्यांनी अशा गंभीर आरोपांना सामोरे गेल्यानंतर यापूर्वी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. कार्यमुक्त होईपर्यंत घटनात्मक पदावरून पायउतार होण्याची राज्यात परंपरा आहे.



संबंधित बातम्या

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांत नाराजी नाट्य सुरु; छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, रवी राणा सह पहा कोण कोण झाले खट्टू

IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी

Maharashtra Cabinet Expansion 2024: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; जाणून घ्या कॅबिनेट मंत्र्यांची संपूर्ण यादी