राज्यसभेच्या 250 व्या सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे
तर हिवाळी संसद सुरु होण्यापूर्वी मोदी यांनी आम्ही सर्व विषयांबाबत खुल्या पद्धतीने चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले. 2019 मधील हे अखेरच संसद अधिवेशन असून 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे.
आजपासून हिवाळी संसदेच्या 250 व्या सत्राला सुरुवात झाली आहे. तर हिवाळी संसद सुरु होण्यापूर्वी मोदी यांनी आम्ही सर्व विषयांबाबत खुल्या पद्धतीने चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले. 2019 मधील हे अखेरच संसद अधिवेशन असून 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच संविधानाला 70 वर्ष पूर्ण होत आहे. तत्पूर्वी सरकार सर्व विषयांवर बोलण्यास तयार आहे.राज्यसभेच्या सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्वाचे मुद्द मांडले आहेत. राज्यसभा हे देशाला नवी दिशा देणारा सुर्य असे म्हणत त्यांनी त्यांचे मुद्दे उपस्थित केले. तर नरेंद्री मोदी यांनी संसदेत काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याबाबत अधिक जाणून घ्या.
-संसदेचे 250 वे सत्र हे अधिक महत्वाचे असून बदलत्या काळानुसार परिस्थिती सुद्धा बदलली आहे. बदलत्या परिस्थीला आत्मसात करत त्यामध्ये मिसळून जाण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला.
- या संसदेत जीएसटीच्या रुपात वन नेशन-वन-टॅक्स बाबत सहमती मिळवून दिली. एवढेच नाही कश्मीर मधील कलम 370 सुद्धा हटवण्याची प्रक्रिया संसदेतून सुरु झाली होती.
- गेल्या 5 वर्षातील कामांबाबत बोलायचे झाल्यास तिहेरी तलाकवर ऐतिहासिक निर्णय देत महिलांना दिलासा दिला आहे. त्याचसोबत सामान्य वर्गासाठी 10 टक्के आरक्षण सुद्धा लागू करण्यात आले.
-तसेच मोदी यांनी राष्ट्रवादी पक्षाचे सुद्धा संसदेत कौतुक केले. त्यांनी असे म्हटले की, राष्ट्रपती आणि बिजू जनता दल या दोन्ही पक्षांनी स्वत:ला एक वेगळी शिस्त लावली आहे.
तर हिवाळी संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी रविवारी एनडीएची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये शिवसेना पक्षाने उपस्थिती लावली नाही. परंतु तरीही बैठकीत राज्यातील आर्थिक मंदी, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांवरील संकट यासारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.