पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सर्व मंत्र्यांसोबत महत्वाची बैठक, रिपोर्ट कार्ड मधून कामाचा आढावा घेणार
या बैठकीत आज मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड पाहिले जाणार असून त्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. असे सांगितले जात आहे की, आजचे मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड पाहून त्यांच्या भवितव्याचा विचार केला जाणार आहे.
मोदी सरकार मधील मंत्र्यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आज मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड पाहिले जाणार असून त्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. असे सांगितले जात आहे की, आजचे मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड पाहून त्यांच्या भवितव्याचा विचार केला जाणार आहे. सुत्रांच्या मते, या बैठकीचे मुख्य उद्दीष्ट असे आहे की योग्य मंत्र्याला प्रमोशन दिले जाणार आहे. तर ज्या मंत्र्यांनी आपले काम चोख पार न पाडले असणार आहे त्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. रिपोर्ट कार्डमध्ये मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर ते आतापर्यंतच्या काळ काय कामे केली आणि त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत की नाही हे पाहिले जाणार आहे.
आजची मोदी यांच्यासोबतची बैठक संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील ही दुसरी बैठक असून मंत्र्यांचे रिपोर्ट्स कार्ड पाहिले जाणार आहे. रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून त्यांच्या सरकारमधील मंत्री कोणती कामे करत आहेत किंवा त्यांच्या भावी योजना काय असणार याचा आढावा घेतला जाणार आहे. तर मंत्र्यांच्या कामात चुक दिसून आल्यास त्यांना पदावरुन हटवण्याची शक्यता आहे. त्याचसोबत काही नव्या चेहऱ्यांना मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळू शकते. याचसाठी मोदी यांनी केंद्रातील मंत्र्यांसह भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा आणि बीएल संतोष यांना बैठकीसाठी बोलावले आहे.मोदी सरकार 2 च्या आजच्या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच कोणत्या मंत्र्यांना धक्का बसणार हे पहाणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.(PM Modi Swearing-in Ceremony 2019: नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, अरविंद सावंत, संजय धोत्रे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ)
लोकसभा निवडणूक 2014मध्ये मिळालेली सत्ता लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कायम राखत पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचा भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA ने केला. भाजप आणि एनडीएने ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवली. मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार 30 मे रोजी सत्तेवर आले होते.