J&K's First CM After Article 370 Abrogation: जम्मू कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर Omar Abdullah पहिले मुख्यमंत्री; Budgam आणि Ganderbal मधून दोन्ही मतदारसंघातून विजयी

2019मध्ये जम्मू कश्मीर मधून कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.

Omar Abdullah | X

जम्मू कश्मीर (Jammu Kashmir) मध्ये आज विधानसभा निवडणूकीचा निकाल (Vidhan Sabha Election Results) जाहीर झाला आहे. उमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी बडगाम आणि गांदरबल या दोन्ही मतदारसंघातून विजय मिळवला आहे. दरम्यान फारूक अब्दुला यांनी जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून उमर अब्दुल्ला शपथ घेतील असं म्हटलं आहे.त्यामुळे आता नव्या कश्मीरचे उमर अब्दुल्ला हे पहिलेच मुख्यमंत्री होणार आहेत.

54 वर्षीय उमर यांना घरातच राजकीय वारसा आहे. ते त्यांच्या कुटुंबातील तिसर्‍या पिढीतील राजकारणी आहेत. दरम्यान 5 ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकार कडून जम्मू कश्मीर मधील कलम 370 हटवण्यात आलं आहे. सोबतच आता लद्दाख ला केंद्रशासित प्रदेश असा दर्जा देण्यात आला आहे.

ओमर अब्दुल्ला यांचा काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये पराभव झाला होता. गंदरबल हा पक्षाचा बालेकिल्ला लढवताना त्यांनी बडगाम विधानसभा मतदारसंघातून देखील निवडणूक लढवली आणि ति जिंकली आहे. दरम्यान लोकसभा निवडणूकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दोन जागेवर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

2008 च्या अखेरीस झालेल्या निवडणुकीत त्यांनी गंदरबल मधून निवडणूक लढवली आणि नॅशनल कॉन्फरन्स हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. ते वयाच्या 38 व्या वर्षी मुख्यमंत्री बनले. देशातील सर्वात तरूण मुख्यमंत्र्यांपैकी ते एक होते.