पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा आज होणार संपन्न, 8000 लोकांच्या उपस्थितीत रंगणार हा भव्यदिव्य सोहळा

नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे.

PM Narendr Modi (Photo Credits: Getty Image)

'ज्याच्यासाठी केला होता अट्टहास हा' तो दिवस आज उजाडलाय. लोकसभा निवडणुकीच्या विक्रमी विजयानंतर अखेर नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. हा भव्यदिव्य सोहळा आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. ह्या सोहळ्याला कोणाकोणाला आमंत्रण करण्यात आले, कोण कोण ह्या सोहळ्याला येणार आहे, कोण नाही येणार आहे या सर्व चर्चांना आज पुर्णविराम मिळेल. अवघा देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता त्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हायला केवळ देशातील नव्हे तर परदेशातील अनेक नामवंत व्यक्तींचे दिल्लीत आगमन होत आहे. नुकतेच भूतानचे पंतप्रधान Lotay Tshering यांचे दिल्लीत आगमन झाले आहे. परराष्ट्र सचिव विजय गोखले(Vijay Gokhale) यांनी त्यांचे दिल्ली विमानतळावर स्वागत केले.

राष्ट्रपती भवनात 2014 ला झालेल्या शपथविधी सोहळ्यासारखेच स्वरूप यंदाही पाहायला मिळणार आहे. या सोहळ्यासाठी 14 राष्ट्रांचे प्रमुख देखील भारतात येणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या पटांगणात हा कार्यक्रम झाल्यानंतर पाहुण्यांसाठी शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही पर्यायांचा समावेश असणार आहे. 2014 मध्ये या कार्यक्रमाला 4000 पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवली होती. तर 2019 च्या या शपथविधी सोहळ्याला 6000 पाहुणे उपस्थित राहणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनाच्या पटांगणात होणा-या भव्यदिव्य अशा शपथविधी सोहळ्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

2014 मध्ये सुरक्षा कारणास्तव पाहुण्यांना पाण्याच्या बॉटल्स राष्ट्रपती भवनाच्या आवरता नेण्यापासुन मज्जाव घालण्यात आला होता. मात्र यंदा तापमानाचा ज्वर पाहता कार्यक्रमाच्या ठिकाणीच पाणी व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात पश्चिम बंगाल हिंसाचारात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना खास आमंत्रण, ममता दीदी मात्र फिरवणार पाठ

2014 नंतर यंदा देखील हा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनच्या पटांगणात होणार आहे यापूर्वी चंद्रशेखर राव आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा यांचा शपथविधी सोहळा या पटांगणात झाला होता. 2014 मध्ये या कार्यक्रमाला 4000 पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवली होती. आज होणा-या ह्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि त्या क्षणाचे ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी फॉलो करा लेटेस्टली मराठी.