पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 सप्टेंबरला एकदिवसीय महाराष्ट्र दौर्‍यावर; मुंबई, नागपूर, औरंंगाबाद शहराला देणार भेट

दिवसीय दौर्‍यामध्ये नरेंद्र मोदी महाराष्ट्रात मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या तीन शहरांना भेट देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी (Photo Credit-PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार 7 सप्टेंबर दिवशी एक दिवसीय महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहेत. येत्या काही दिवसातच महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा महत्त्वाचा आहे. या एक दिवसीय दौर्‍यामध्ये नरेंद्र मोदी महाराष्ट्रात मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या तीन शहरांना भेट देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर महाजनादेश या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेचा दुसरा टप्पा समारोपाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (2 सप्टेंबर) महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आचारसंहिता 13 सप्टेंबर पासून लागू होणार- रावसाहेब दानवे

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी 2014 साली विधानसभा निवडणूकीचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात आले होते. त्यानंतर हा आता त्यांचा दुसरा औरंगाबाद दौरा असेल. या दौर्‍यात औरंगाबाद शहराला जागतिक स्तरावर अत्याधुनिक औद्योगिक शहर या मोहिमेचा पहिला टप्पा पार देशाला समर्पित करण्यासाठी मोदी येणार आहेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच मोदी, शहा यांच्या दौर्‍यांमुळे भाजपा मोठ्या निवडणूक प्रचाराचे बिग्युल वाजवण्यास केल्याचे म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif