राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये काल नरेंद्र मोदीसह 58 खासदारांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यापैकी महाराष्ट्राला 8 मंत्रिपदं मिळाली.
Modi Cabinet 2019 खाते वाटप जाहीर; अमित शहा गृहमंत्री तर निर्मला सीतारामण अर्थमंत्री
काल भारत देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर आज अमित शहा गृहमंत्री, निर्मला सीतारामण अर्थमंत्री तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खातं सोपावण्यात आलं आहे.
Narendra Modi Cabinet portfolios 2019 : नरेंद्र मोदी यांच्यासह 58 खासदारांनी भाजप प्रणित एनडीए सरकारमधील खासदारांनी काल (30 मे) दिवशी राष्ट्रपती भवनाच्या पटांगणात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. देशा परदेशातील दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये रंगलेल्या भव्य सोहळ्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. काल भारत देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर आज अमित शहा (Amit Shah) गृहमंत्री, निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman ) अर्थमंत्री तर राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्याकडे संरक्षण खातं सोपावण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथ सोहळ्याला शरद पवार यांची अनुपस्थिती; 'हे' आहे पडद्यामागचं कारण
मोदी सरकारध्ये कुणाच्या वाट्याला आलंय कोणतं पद
डॉ. सुब्रमण्यम जयशंकर- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
अमित शहा-गृहमंत्री
राजनाथ सिंग-संरक्षण मंत्री
नितीन गडकरी-परिवहन मंत्री
सदानंद गौडा- केमिकल आणि फर्ल्टीलायझर
निर्मला सीतारामन- अर्थमंत्री
रामविलास पासवान- अन्न आणि औषध प्रशासन
नरेंद्रसिंह तोमर-कृषी व ग्राम विकास आणि पंचायत राज
रविशंकर प्रसाद - कायदा मंत्री
हरसिमरत कौर बादल- अन्न प्रक्रिया
थवरचंद गहलोत- सामाजिक न्याय
डॉ. रमेश निशांक- मनुष्यबळ विकास मंत्रालय
अर्जुन मुंडा - आदिवासी कल्याण
स्मृती इराणी - महिला आणि कुटुंंब कल्याण मंत्री
डॉ. हर्षवर्धन- आरोग्य आणि विज्ञान
प्रकाश जावडेकर- पर्यावरण मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पीयूष गोयल- रेल्वे मंत्री, वाणिज्य आणि उद्योग
धर्मेंद्र प्रधान- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
मुख्तार अब्बास नक्वी-अल्पसंख्यांक मंत्री
प्रल्हाद जोशी- संसदीय कामकाज मंत्री, कोळसा मंत्री
डॉ. महेंद्रनाथ पांडे- उद्योजग कौशल्य विकास मंत्रालय
अरविंद सावंत - अवजड उद्योग मंत्रालय
गिरिराज सिंह - पशुसवंर्धन आणि मत्स पालन
गजेंद्रसिंह शेखावत- जल मंत्रालय
राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार
संतोष गंगवार- रोजगार आणि श्रम मंत्रालय.
राव इंद्रजित- प्लॅनिंग मंत्रालय
श्रीपाद नाईक- आर्युवेद आणि योग मंत्रालय
जितेंद्र सिंह- पंतप्रधान कार्यालय
किरण रिजीजू- क्रीडा आणि युवा कल्याण
प्रल्हादसिंह पटेल- पर्यटन आणि संस्कृती मंत्रालय
आर. के. सिंग- ऊर्जा आणि कौशल्य मंत्रालय
हरदीपसिंग पुरी- बांधकाम आणि नागरी विकास मंत्रालय
मनसुख मांडविया - जहाज बांधणी, केमिकल आणि फर्ल्टीलायझर
फग्गनसिंह कुलस्ते - स्टील मंत्रालय
अश्विनीकुमार चौबे- आरोग्य आणि कुटुंब कल्याण
अर्जुनराम मेघवाल- संसदीय कामकाज मंत्रालय
व्ही. के. सिंग- परिवहन मंत्री आणि रस्ते विकास
कृष्णपाल गुर्जर-सामाजिक न्याय
रावसाहेब दानवे- ग्राहक संरक्षण
किशन रेड्डी - गृहमंत्री
पुरुषोत्तम रुपाला - कृषी
रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री
साध्वी निरंजन ज्योती-ग्रामीण विकास
बाबुल सुप्रियो-पर्यावण आणि वन
संजीव बलियान- पशुसवंर्धन आणि मत्स पालन
संजय धोत्रे- मनुष्यबळ
अनुरागसिंह ठाकूर-अर्थ
सुरेशचंद्र अंगडी- रेल्वे
नित्यानंद राय- गृह
व्ही. मुरलीधरन- परराष्ट्र व्यवहार
रेणुका सिंह सरुता - आदिवासी
सोम प्रकाश-वाणिज्य आणि उद्योग
रामेश्वर तेली- अन्न प्रक्रिया
प्रतापचंद्र सारंगी- लघु उद्योग
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)