Monsoon Session of Parliament: संसद अधिवेशनापूर्वी काँग्रेसमध्ये हालचाल; जयराम रमेश, गुलाम नबी आजाद, आनंद शर्मा यांच्याकडे महत्वाची जबाबदारी

जी संसदेतील अध्यादेशांवर काम करेन. या समितीत वरिष्ठ नेते पी चिदंबरम, दिग्विजय सिंह, जयराम रमेश, डॉ. अमर सिंह आणि गौरव गोगोई यांचा समावेश आहे.

Sonia Gandhi | ( Photo Credits: inc.in)

काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून पक्षातील 23 नेत्यांनी लिहिलेल्या 'त्या' पत्राचे पडसाद पक्षात उमटू लागले आहेत. दरम्यान, दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षातही मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार येत्या 14 सप्टेंबरपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु हेण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी काँग्रेसने 10 सदस्यांचा एक गट तयार केला आहे. हा गट संसदेशी संबंधीत सर्व बाबी पाहणार आहे. तत्पूर्वी काँग्रेसने एक 5 सदस्यांची समितीही स्थापन केली आहे जी मुख्य अध्यादेशांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करु शकेन.

वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्यान दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, काँग्रेसने गौरव गोगोई यांना लोकसभेतील उपनेता म्हणून जबाबदारी दिली आहे. याशिवाय जयराम रमेश हे मुख्य व्हिप म्हणून तर रवनीत सिंह बि्टू हे लोकसभा पक्षाचे उप व्हिप म्हणून काम पाहणार आहेत. संसदेतील प्रकरणांसाठी काँग्रेसने 10 सदस्यंची समिती स्थापन केली आहे. यात पक्षाचे राज्यसभा आणि लोकसभा अशा दोन्ही सभागृहातील नेत्यांचा समावेश आहे. (हेही वाचा, केंद्राला घाबरायचं की लढायचं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत रोखठोक विधान)

काँग्रेस समितीतील सदस्य

दरम्यान, काँग्रेसने कालच 5 सदस्यांची एक समिती स्थापन केली होती. जी संसदेतील अध्यादेशांवर काम करेन. या समितीत वरिष्ठ नेते पी चिदंबरम, दिग्विजय सिंह, जयराम रमेश, डॉ. अमर सिंह आणि गौरव गोगोई यांचा समावेश आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 14 सप्टेंबरपासून सुरु होऊ शकते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. या वेळी संसदेचे अधिवेशन 18 दिवसांचे असेल. अधिवेशनादरम्यन कोणत्याही प्रकारची सुट्टी, साप्ताहिक सुट्टी घेतली जाणार नाही.