काहीही हं! मोदी साडी विरुद्ध राहुल साडी, प्रियंका साडी आकर्षणाचा विषय; लोकसभा निवडणूक 2019 प्रचारास हटके सुरुवात

भाजप कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये मोदी साडीची (Modi saree) भलतीच चर्चा असायची. मात्र, आता यात आणखी दोन चेहऱ्यांची भर पडली असून, राहुल साडी (Rahul Sadi) आणि प्रियंका साडी (Priyanka Sadi) मोदी साडीला टक्कर देताना दिसत आहेत.

Modi saree against Rahul saree and Priyanka saree | (Photo credit: archived, edited, representative image)

अलिकडील काही वर्षांत निवडणूक प्रचार पहिल्यासारखा निकोप राहिला नाही. आधुनिक प्रसारमाध्यमं आणि तंत्रज्ञानाचा बेसुमार वापर करत सर्वच राजकीय पक्ष लोकांच्या जीवनशैलीत घुसखोरी करु पाहात आहेत. ही घुसखोरी लोकांचे कपडे, दैनंदिन वस्तू आदींवर राजकीय पक्षांचे लोगो आणि नेत्यांच्या प्रतिमांचा होणारा वापर यातून पुढे येताना दिसतो. अशिया खंडातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरत येथील बाजारात (Surat textile Market) ही स्पर्धा अधिक तीव्र होताना पाहायला मिळते . सुरुवातीला सूरतच्या कपडा मार्केटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या प्रतिमेचा साडीवर खुबीने वापर केला जायचा. भाजप कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये मोदी साडीची (Modi saree) भलतीच चर्चा असायची. मात्र, आता यात आणखी दोन चेहऱ्यांची भर पडली असून, राहुल साडी (Rahul Sadi) आणि प्रियंका साडी (Priyanka Sadi) मोदी साडीला टक्कर देताना दिसत आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या प्रतिमा असलेल्या साड्या बाजारात आल्या आहेत. या साड्यांबाबतही मोठ्या प्रमाणावर मतदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते आहे. लोकसभेचा कार्यकाळ तर संपला. मात्र, अद्याप लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून झाली नाही. असे असले तरी, राजकीय पक्षांनी मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन निवडणुक प्रचाराचे बिगूल फुंकले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

अधिकाधिक व्याप्त स्वरुपात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. त्यासाठी प्रचार साहित्य आणि आकर्षक घोषणांचा वापर करण्यात येतो आहे. नेत्यांच्या प्रतिमा असलेल्या साड्यांची निर्मिती हासुद्धा त्याचाच एक भाग आहे. (हेही वाचा, 'प्रियंका गांधी यांचा राजकारण प्रवेश काँग्रेससाठी ठरणार धनलक्ष्मीचे वरदान, संपणार अपूऱ्या पक्षनिधीची समस्या')

सन 2014 पूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरत कापड बाजारात प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाची छाप दिसायची. त्यामुळे इथल्या साड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा वापर केलेला पाहायला मिळायचे. या साड्या देशभरातील विविध राज्यांमध्ये पाठवल्या जायच्या. परंतू, आता काँग्रेसनेही अशा प्रकारच्या साड्यांमध्ये बाजी मारली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif