Nitin Gadkari: अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणींच्या कामामूळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सत्ता आली : नितीन गडकरी
"अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा" असे वक्तव्य केले होते आणि आज त्यांचे वक्तव्य खरे ठरले कारण जनतेने आम्हाला साथ दिली, असं गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी (Nitin Gadkari) कायमच आपल्या अनोख्या कार्यशैलीसाठी चर्चेत असतात. केवळ भाजपकडूनचं (BJP) नाही तर विरोधकाकडून देखील गडकरींच्या कामाचं कौतुक होत. गडकरी म्हणजे स्पष्ट वक्ते. भाजपचे सरकारमधील नितीन गडकरी एक महत्वाचे नेते असुन देखील बरेचदा ते परखडपणे स्वतच्या भुमिका मांडताना दिसतात. नुकतचं भाजपच्या सदस्यीय समितीतून (Bjp Parliamentary board) नितीन गडकरींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. याच बरोबर नितीन गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा देशाच्या राजकारणात होवू लागली. तरी अद्याप यावर कुठलही प्रतिक्रीया नितीन गडकरी यांनी दिलेली नाही.
नुकत्याच नागपूरात (Nagpur) पार पडलेल्या एक कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपलं परखड मतं मांडताना दिसले. गडकरी म्हणाले की, काही काळापूर्वी पक्षाची स्थिती खूप बिकट होती. मात्र अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee), लालकृष्ण आडवाणी (Lal Krishna Advani), दीनदयाल उपाध्याय (Dindayal Upadhyay) आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी भरपूर कामे केली. त्यानंतरच आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आणि देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आली आहे. "अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा" असे वक्तव्य केले होते आणि आज त्यांचे वक्तव्य खरे ठरले कारण जनतेने आम्हाला साथ दिली, असं गडकरी म्हणाले. (हे ही वाचा:- Congress President: राहुल गांधी यांच्या अनिच्छेनंतर काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष निवड प्रक्रियेस सुरुवात; 20 सप्टेंबरच्या वेळापत्रकावर पक्ष ठाम)
तरी हल्ली मोदी-शाहच्या जोडीत देशाचा कारभार सुरु असला तरी नितीन गडकरी त्याच्या भाषण शैलीतून कायमच अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, दीनदयाल उपाध्याय यांसारख्या जेष्ठ भाजप नेत्यांची आठवण काढताना दिसतात. गडकरींच्या कामात तसेच भाषणामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या कामाची छाप दिसून येते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)