IPL Auction 2025 Live

Mumbai Local Train Station Name Changed: लोकल प्रवाशांना सुखकारक प्रवास द्या, स्टेशनची नावं बदलून उपयोग नाही; सरकारला मनसेचा खोचक सल्ला

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकारने मान्य केला असून यावरुन मनसेनं टोला लगावला आहे.

Photo Credit - Facebook

Mumbai Local Train Station Name Changed: राज्य मंत्रीमंडळाने बुधवारी मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावरील 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याला मंजुरी दिली. मध्य रेल्वेवरील 2, पश्चिम रेल्वे मार्गावरील 2 आणि हार्बर मार्गावरील 4 स्थानकांची नावं बदलण्याला सरकारने मंजुरी दिली. मात्र या नामांतरणावरुन राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS )टोला लगावला आहे. मनसेचे एकमेव आमदार प्रमोद पाटील (Pramod Patil )यांनी रेल्वे स्थानकाच्या नामांतरणावरुन खोचक टीका केली आहे. "केवळ रेल्वे स्थानकांची नावे बदलून उपयोग नाही. आधी लोकल प्रवाशांना सुखकारक प्रवास करता येईल या दृष्टीने सरकारने प्रयत्न केले पाहिजेत", असे प्रमोद पाटील यांनी म्हटले आहे . (हेही वाचा:MNS 18th Foundation Day: 'माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत'; Raj Thackeray यांनी 18 व्या वर्धापन दिनी कार्यकर्त्यांना दिला 'संयम' ठेवण्याचा मूलमंत्र)

प्रमोद पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघात 26 कोटी 50 लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ केला. या उद्घाटन सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबद्दल भाष्य केलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील लोकांना लोकल ट्रेनसंदर्भातील अनेक समस्या असल्याचा उल्लेख प्रमोद पाटील यांनी आवर्जून केला. येथून लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्या भेडसावतात. (हेही वाचा:Vasant More Quits MNS: मनसेचे फायरब्रॅन्ड नेते वसंत मोरे यांचा राज ठाकरे यांना राजीनामा देत 'जय महाराष्ट्र'!)

या समस्या सोडवण्यासाठी कोणी पुढाकार घेतलेला नाही, असं प्रमोद पाटील म्हणाले. तसेच सर्वच खासदारांकडून लोकल ट्रेनच्या प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा इशारा देत प्रमोद पाटील यांनी टीका केली. आतापर्यंत किती खासदारांनी लोकल प्रवाशांच्या समस्या मार्गी लावल्या? असा प्रश्न प्रमोद पाटील यांनी विचारला. तसेच पुढे बोलताना "केवळ रेल्वे स्थानकांची नावे बदलून उपयोग नाही. आधी लोकल प्रवाशांना सुखकारक प्रवास करता येईल या दृष्टीने सरकारने प्रयत्न केले पाहिजेत" असं मनसे आमदाराने म्हटलं.