Manish Sisodia: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी, मनिष सिसोदियांसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रीया
लुक आऊट सर्कुलर बाबत प्रतिक्रीया देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसह खुद्द मनिष सिसोदिया यांनी याबाबत प्रतिक्रीया दिली आहे.
महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी (ED)-सीबीआय(CBI) अशा विविध केंद्रीय संस्थांकडून (Central Agencies) कारवाई सुरु आहे. गेले काही दिवसांपूर्वीचं शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी (Patra Chawl Scam) ईडीकडून (ED) अटक करण्यात आली. केंद्रीय यंत्रेणेच्या छापेमारीचा सपाटा फक्त महाराष्ट्रातचं (Maharashtra) नाही तर दिल्लीत (Delhi) देखील बघायला मिळत आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Delhi Deputy CM Manish Sisodia) यांची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरु आहे. आता दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्या संबंधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह विरुद्ध लुक आऊट सर्कुलर (Look Out Circular) जारी केले आहे.
LOC बाबत मनिष सिसोदिया यांनी प्रतिक्रीया देत मोदी सरकारवर (Central Government) हल्लाबोल केला आहे. माझ्यावर टाकलेल्या सगळ्या धाडी फेल झाल्या, कुणालाही काहीही मिळालेलं नाही, कुठेही एक पैश्याची देखील हेराफेरी नाही म्हणून आता नाईलाजाने हा लूकआऊट नोटीस (Look Out Notice) जारी करण्यात आला आहे, अशी टीका मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी केली आहे. तसेच LOC हे काय नाटक आहे, मी स्वच्छदी दिल्लीत (Delhi) फिरत आहे, मी कुठे यायचं ते सांगा असा सवाल मनिष सिसोदिया यांनी थेट पंतप्रधान मोदींना (PM Modi) विचारला आहे. (हे ही वाचा:- Sharad Pawar On Bihar Politics: Nitish Kumar यांनी उचलेले पाऊल हे शहाणपणाचे; शरद पवारांची BJP वर टीका, नितिश कुमारांचे कौतुक)
तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी देखील मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली आहे. महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemplyoment) सारखे महत्वाचे प्रश्न देशासमोर असताना रोज केंद्र सरकार CBI आणि ED चा खेळ खेळतात. केंद्र सरकारने देशातील संकटांविरुध्द लढायाला हवं तर हे सरकार संपूर्ण देशासोबत लढायला निघालं आहे. CBI आणि ED चौकशीला तीव्र विरोध दर्शवत अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.