Madhya Pradesh Assembly Elections 2018 Exit Poll: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे पारडे जड, भाजप पराभवाच्या छायेत; पाहा कुणाला किती जागा?

त्यामुळे विविध वृत्तवाहिण्या, संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणतातील निकालाबाबतचे अंदाज जाहीर झाले आहेत. या संस्थांचे एक्झिट पोल काय सांगत आहेत? हे विस्ताराने जाणून घ्या...

Rajasthan Assembly Assembly Elections 2018 | (Photo courtesy: Archived, edited and representative images)

Madhya Pradesh Assembly Elections 2018 Exit Poll Results: मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान ( Rajasthan), छत्तीसगढ (Chhattisgarh), तेलंगणा (Telangana) आणि मिझोराम (Mizoram)या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरु असलेले मतदान आज (शुक्रवार, ७ डिसेंबर) पूर्ण झाले. मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आणि मिझोराम या राज्यांसाठी मतदान आगोदरच पूर्ण झाले होते. तर, राजस्थान आणि तेलंगणासाठी मतदान आज पार पडले. पाचही राज्यातील मतदानानंतर 11 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. दरम्यान, तोपर्यंत सर्वांना उत्सुकता लागली आहे ती एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात याकडे. त्यामुळे विविध वृत्तवाहिण्या, संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणतातील निकालाबाबतचे अंदाज जाहीर झाले आहेत. या संस्थांचे एक्झिट पोल काय सांगत आहेत? हे विस्ताराने जाणून घ्या...

विविध संस्थांचे एक्झिट पोल काय सांगत आहेत?

(हेही वाचा : राजस्थानमध्ये जनादेश काँग्रेसच्या बाजूने, भाजप सत्तेतून पायऊतार होण्याची शक्यता)

मध्यप्रदेश विधानसभेसाठी एकूण मतदारसंख्या 5,04,95,251 इतकी आहे. त्यापैकी 2,63,01,300 पुरुष, 2,41,30,390 महिला मतदार आहेत. तर, 1,389 थर्ड जेंडर मदतार आहेत. एकूण मतदारांपैकी निवडणूक प्रक्रियेसाठी कर्तव्यवावर असलेल्या 65,000 मतदारांनी पोस्टाद्वारे मतदान केले आहे. उर्वरीत 5,04,33,079 मतदार मतदानाचा हक्क आज बजावत आहेत. या निवडणुकीसाठी 1,094 अपक्ष उमेदवारांसह एकूण 2,899 उमेदवार मैदानात आहेत. ज्यात 2,644 पुरूष, 250 महिला तर ५ ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश आहे.