Loksabha Elections 2019: मी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, मोदींची नाही, 'चौकीदार चोर है' हे विधान योग्यच : राहुल गांधी
काँगेसच्या मुख्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ले चढवले, यावेळी चौकीदार चोर है प्रकरणी सुप्रीम कोर्टाची माफी मागितल्याबद्दल राहुल यांनी माध्यमांना स्पष्टीकरण दिले.
नवी दिल्ली: शनिवारी,4 मे रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandi) यांनी भाजपा (BJP) व पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर एकापेक्षा एक आरोप करत चांगलीच झोड घेतली. काँग्रेस मुख्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना, "पंतप्रधान मोदी ज्या लष्कराच्या जीवावर मत मागत आहेत, ते त्यांचा स्वतःच मान ठेवत नाहीयेत असं म्हणत राहुल यांनी मोदींनी काँग्रेसच्या काळात झालेल्या सर्जिकल स्ट्राईक ची व्हिडीओ गेम्स सोबत तुलना करणे हा लष्कराचा अपमान आहे असे सांगितले.
काहीच दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court Of India) नाव घेत चौकीदार चोर है बाबत चुकीचे विधान केल्यामुळे राहुल गांधींना माफी मागावी लागली होती मात्र आपण सुप्रीम कोर्टाची माफी मागितली आहे, नरेंद्र मोदी किंवा भाजपाची नाही असे म्हणत अजूनही निवडणुकीसाठी चौकीदार चोर है हे काँग्रेसचे घोषवाक्य असणार असल्याची माहिती देखील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.
ANI ट्विट
शुक्रवारी एका सभेत बोलत असताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसला संबोधून "आता निवडणुकांच्या काळात सर्वच जण सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या बाता मारत आहे हा काही कोणता व्हिडीओ गेम नाही" असे विधान केले होते, यावर आज राहुल गांधीनी, मोदी देशाच्या सुरक्षा दलाला स्वतःची मालमत्ता समजत आहेत, देशाचे वायू दल, नौदल व सेना ही जनतेसाठी आहे, मोदींची नाही" अशा शब्दात पलटवार केला. याशिवाय सध्या झालेले सर्जिकल स्ट्राईक्स हे देशील देशाच्या सैन्याने केले आहेत मोदींनी नाही, त्याचे श्रेय स्वतःकडे घेऊन त्याचे राजकारण करणे गैर आहे अशी टीका देखील राहुल यांनी केली.
ANI ट्विट
यंदाच्या निवडणुकीत जनता भाजपाला काहीही झाल्यास निवडून देणार नाही असा आमचा विश्वास आहे मात्र राहुल गांधी कोणीही नसून त्याच्याआधी देश मोठा व महत्त्वाचा आहे असे देखील या परिषदेत राहुल यांनी म्हंटले आहे. Loksabha Election 2019: निवडणूक आयोगाचा भाजपा साठी मवाळ पवित्रा: राहुल गांधी
निवडणुकांमध्ये काँग्रेसचे प्रचार उद्दिष्ट हे देशातील वाढत्या बेरोजगारी, भ्रष्टाचार, व जनसामान्यांच्या प्रश्नांवर उत्तर शोधणे हेच असणार आहे, मोदींनी याकडे दुर्लक्ष केले असल्याने आज निवडणूक संपायच्या अर्ध्या टप्प्यावर येऊनही त्यांना हरण्याची भीती वाटत आहे असे राहुल यांनी सांगितले. राफेल ते बेरोजगार या सर्व मुद्द्यांवर मोदी, अमित शहा व भाजपा सोबत चर्चा करण्यासाठी तयारी दर्शवत निदान या गोष्टींचा तपास तरी केला गेला पाहिजे अशी मागणी त्यांनी या माध्यमातून केले आहे.