आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात याचिका दाखल, उद्या सुनावणी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजप (BJP) पक्षाध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टातv(Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा (फोटो सौजन्य- PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजप (BJP) पक्षाध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टातv(Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. तर आचार संहितेचे उल्लंघन केल्यामुळे यांच्या विरुद्ध याचिका सुष्मिता देव (Shushmita Dev) यांनी दाखल केली आहे. तर निवडणूक आयोगाला याचे स्पष्टीकरण देण्यात यावे असेसुद्धा याचिकेत म्हटले आहे.

काँग्रेस (Congress) पक्षातील खासदार सुष्मिता देव यांनी आचार संहितेचे उल्लंघन केल्याचे याचिकेत म्हटले आहे. तर उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी येथून प्रियांका गांधी नाही तर अजय राय टक्कर देणार)

तर देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा नरेंद्र मोदी यांनी आचार संहितेचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले होते. मात्र निवडणूक आयोगाने मोदी यांनी आचार संहितेचा भंग केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.