स्मृती इराणी शिक्षण वाद: लोकसभा निवडणूक 2019 च्या शपथपत्रामध्ये B Com Part 1 पूर्ण नसल्याची माहिती

दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून स्मृती इराणींनी बी कॉमच्या कोर्सला प्रवेश घेतला होता मात्र तो पूर्ण न केल्याची माहिती समोर आली आहे

Union Minister Smriti Irani (Photo Credits: ANI)

Smriti Irani Education Qualification: केंद्रीयमंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांची पदवी कायम वादात राहिली आहे. मागील पाच वर्षांपासून सुरू असलेला वाद आता पुन्हा लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीमध्ये समोर आला आहे. बीए (BA), बीकॉम (BCom) पासून परदेशातील युनिव्हर्सिटीमधून पदवीधर असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र लोकसभा निवडणूक 2019 च्या शपथपत्रामध्ये त्याचा खुलासा करण्यात आला आहे.  मोदी सरकारच्या काळात स्मृती इराणी मनुष्यबळ विकासमंत्री (HRD Minister) होत्या.

स्मृती इराणी शिक्षण

दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून स्मृती इराणींनी बी कॉमच्या कोर्सला प्रवेश घेतला होता मात्र तो पूर्ण न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी 2014 आणि 2019मध्ये शिक्षणाबद्दल वेगवेगळी माहिती दिली होती.

2014 साली त्यांनी बीए असल्याचं नमूद केलं होतं तर 1994 साली बीकॉम पार्ट 1 चं शिक्षण घेतल्याची माहिती दिली. मात्र अद्याप तो 3 वर्षाचा कोर्स पूर्ण झाला नसल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

जेव्हा स्मृती इराणींवर 'अशिक्षित' अशी टीका करण्यात आली होती तेव्हा त्यांनी, आपण परदेशातील विद्यापीठातून पदवीधर असल्याच सांगितलं होतं, पुराव्यानिशी युनिव्हर्सिटीने आपल्यातील नेतृत्त्वगुण कसे हेरले हे सांगू शकतो असा दावा करण्यात आला होता. मात्र त्यांनी यंदा दाखल केलेल्या शपथपत्रात त्याचा उल्लेख केलेला नाही.

अमेठी लोकसभा मतदार संघामधून स्मृती इराणी निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्यासमोर राहुल गांधी यांचे आव्हान आहे.