Lok Sabha Elections 2019: EVM मध्ये बिघाड असल्याच्या संताप, आंध्र प्रदेशातील आमदाराने मशीन जमिनीवर फेकली (Video)
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानामुळे लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानामुळे लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तसेच देशात पहिल्या टप्प्यासाठी 20 राज्यातील 91 जागांसाठी मतदान आज (11 एप्रिल) पार पाडणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मिर, आंध्र प्रदेश येथे आज मतदानाचा हक्क लोक बजावताना दिसून येणार आहेत. यामधील 91 जागांसाठी एकूण 1279 उमेदवार निवडणुक लढवणार असून त्यांचे भाग्य आज EVM मशीन मध्ये बंद होणार आहे.
आंध्र प्रदेशातील (Andra Pradesh) गुंटूर येथील जन सेना पक्षाचे आमदार मधूसूदन गुप्ता हे मतदान करण्यासाठी आले होते. परंतु ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड असल्याच्या संतापाने त्यांनी ती जमिनीवर फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. त्याचसोबत जर ईव्हीएममधील बिघाड दूर करता येऊ शकत नसल्यास अन्य मशीन्सचीसुद्धा तोडफोड केली जाईल असे म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे गुप्ता यांना पोलिसांनी अटक केली आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: ऑनलाईन आणि SMS च्या माध्यमातून तुमचं मतदान केंद्र कसं पहाल?)
ANI ट्वीट:
आजपासून सुरु झालेले मतदान देशात सात टप्प्यात पार पडणार आहे. तर 23 मे पर्यंत या मतदानाचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी राजकरणातील अनेक दिग्गज मंडळींचे भाग्य आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.