'मी छुपा रुस्तम नाही, मला पंतप्रधान बनण्याची इच्छा नाही', नितीन गडकरी यांचा पुनरुच्चार

तसेच ते भाजपचे नेतेही आहेत. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. महराष्ट्रातील मतदान संपले आहे आणि जनतेने आपला कौल दिला आहे. आता मतमोजणीच्या दिवसाची प्रतिक्षा आहे.

Nitin Gadkari | (Photo Credit: Facebook)

Lok Sabha Elections 2019: राजकारणामध्ये प्रत्येक वेळीच दोन आधी दोन बरोबर चार होतात असे नाही. मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही. तसेच, मी छुपा रुस्तमही नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे. दरम्यान, एनडीएच्या रुपात भारतीय जनता पक्ष (BJP) दुसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्तेत येईल. 2014 मध्ये सरकारविरोधी लाट होती. जनतेच्या मनात पंतप्रधान पदाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्याविषयी आपेक्षा होत्या. त्यामुळेच भाजपला केंद्रात बहुमत मिळाले. गेल्या पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाच्या जोरावर 2019 मध्यही पुन्हा भाजपच सत्तेत येईल असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते.

नितीन गडकरी हे केंद्रात मंत्री आहेत. तसेच ते भाजपचे नेतेही आहेत. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. महराष्ट्रातील मतदान संपले आहे आणि जनतेने आपला कौल दिला आहे. आता मतमोजणीच्या दिवसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, एनडीटीव्हीशी बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, ओडिशा आणि बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढतील. उत्तर प्रदेशमध्येही भाजपला मोठ्या प्रामाणावर यश मिळताना दिसत आहे. विरोधकाच्या आघाडीबद्दल बोलताना गडकरी यांनी म्हटले आहे की, इंदिरा गांधी यांच्याही विरोदातत अनेक पक्ष एकत्र आले होते. तरीसुद्धा इंदिरा गांधी यांनी निवडणूक जिंकली. उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपाची मतं एकत्र येणार नाहीत, असाही दावा गडकरी यांनी केला. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे 'India's Divider In Chief', टाईमच्या कव्हर फोटोवरुन गदारोळ होण्याची शक्यता)

नितीन गडकरी यांनी पुढे म्हटले की, बेरोजगारी ही केवळ गेल्या 5 वर्षातील समस्या नाही. गेली 72 वर्षे ही समस्या कायम आहेच. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. भ्रष्टाचार आणि भ्रष्ट यंत्रणा हेच सर्व समस्यांचे मूळ आहे. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत अनेक कामं केली. आयुषमान योजना, अज्ज्वला योजना, केट्यवधी लोकांना सिलिंडर मिळाले. गंगा सफाई अशी एक ना अनेक कामं केल्याचेही गडकरी यांनी सांगितले.