Lok Sabha Elections 2019: तेलगु दसम पार्टीमधील खासदाराच्या घरावर आयकर विभागाकडून छापा, कार्यकर्त्यांनी केले आंदोलन
आंध्र प्रदेशामधील (Andhra Pradesh) तेलगु दसम पार्टीचे (TDP) खासदार जयदेव गल्ला (Jayadev Galla) यांच्या घरावर मंगळवारी रात्री आयकर विभागाने छापा टाकला.
Lok Sabha Elections 2019: आंध्र प्रदेशामधील (Andhra Pradesh) तेलगु दसम पार्टीचे (TDP) खासदार जयदेव गल्ला (Jayadev Galla) यांच्या घरावर मंगळवारी रात्री आयकर विभागाने छापा टाकला. मात्र छापा टाकल्यानंतर टीडीपी कार्यकर्त्यांनी या कारवाईविरुद्ध आंदोलन केले.
आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईचा आरोप पक्षाचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर करत आहेत. तर निवडणुक आयोगाकडून परवानगी देण्यात आली आहे का किंवा जगनमोहन रेड्डी यांच्या सांगण्यानुसार नरेंद्र मोदी कारवाई करत आहेत असा प्रश्न पक्ष प्रवक्ता एल. दिनाकरन यांनी यावेळी उपस्थित केला आहे.(हेही वाचा-मध्य प्रदेशमध्ये खळबळ; आयकर विभागाचा मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्या घरावर छापा, 9 कोटी जप्त)
तर जयदेव यांनी एका व्यक्तीला आयकर विभागाने अटक केली असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत पक्षातील नेत्यांना आयकर विभाकडून लक्ष करत असल्याचे जयदेव यांनी विधान केले आहे.