Lok Sabha Elections 2019: राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचा नेत्यांनी लावला आरोप, गृह मंत्रालयाने दिले उत्तर

काँग्रेस पक्ष (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बुधवारी अमेठी (Amethi) येथून उमेदवारी अर्ज भरला.

Rahul Gandhi (Photo Credits-Twitter)

Lok Sabha Elections 2019: काँग्रेस पक्ष (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बुधवारी अमेठी (Amethi) येथून उमेदवारी अर्ज भरला. मात्र त्यावेळी राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित केला असून त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी म्हटले होते. तर नेत्यांनी राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना एका पत्रकाद्वारे याबद्दल अधिक तपासणी करण्यात यावी असे म्हटले होते. त्यामुळे आता गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यावर उत्तर दिले असून राहुल गांधी यांच्या जीवाला कोणताच धोका नसल्याचे म्हटले आहे. तर राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर दिसून आलेला हिरव्या रंगाच्या बिंदूची निशाणी ही एका फोटोग्राफरच्या मोबाईलची असल्याचे उत्तरात म्हटले आहे. त्याचसोबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

अमेठी येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी पत्रकारांसोबत बातचीत करत होते. त्यावेळी राहुल गांधी यांच्या डोक्याच्या भागावर हिरव्या रंगातील लेझर लाईटची खुण दिसून आली. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती बाळगली जात होती. या प्रकारावरुन काँग्रेस पक्षाने माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येबद्दलही बोलण्यात आले.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: अमेठी येथून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत रोड शो)

या प्रकारामुळे युपी प्रशासनाकडून एक गंभीर चूक म्हणून काँग्रेसने सरकारला कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे राजकीय मतभेद बाजूला ठेलून राहुल गांधी यांची सुरक्षा करणे ही सरकार आणि मंत्रालयाची प्रथम जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.