Lok Sabha Elections 2019: भाजपला मोठा धक्का; 2 मंत्री, 12 आमदार यांच्यासह 15 नेत्यांनी सोडला पक्ष

विधानसभा निवडणुकीत भाजपने पक्षाचे राज्य सरचिटणीस जारपुम गामलिन, गृहमंत्री कुमार वाई, पर्यटन मंत्री जारकर गामलिन आणि इतर काही आमदारांना तिकीट नाकारले. त्यामुळे हे नेते नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगितले जात आहे.

15 Senior BJP Leaders Join Conrad Sangma's National People's Party In Arunachal Pradesh | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2019) रधणधुमाळी देशभरात सुरु असतानाच भारतयी जनता पक्षाला मोठा दणका बसला आहे. 2 मंत्री आणि 12 आमदार यांच्यासह तब्बल 15 नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अरुणाचल प्रदेश या भारतातील पूर्वेकडील राज्यात भाजपला हा दणका बसला आहे. भाजप सोडलेले सर्व नेते हे कोनराड संगमा (Conrad Sangma) यांच्या नॅशनल पीपुल्स पार्टी (National People's Party) मध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने पक्षाचे राज्य सरचिटणीस जारपुम गामलिन, गृहमंत्री कुमार वाई, पर्यटन मंत्री जारकर गामलिन आणि इतर काही आमदारांना तिकीट नाकारले. त्यामुळे हे नेते नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगितले जात आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 60 जागांपैकी 54 जागांसाठी उमेदवार यादी भाजपच्या केंद्रीय समितीने रविवारी निश्चित केली. या यादीत पक्ष सोडण्याची घोषणा केलेल्या मंत्री, आमदार आणि नेत्यांची नावे नाहीत. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणउका एकत्रच पार पडत आहेत. येत्या 11 एप्रिल रोजी तिथे दोन्ही निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे.

कोनराड संगमा यांच्या नॅशनल पीपुल्स पार्टीमध्ये प्रवेश

जारपुम गामलिन यांनी अरुणाचल राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष तापिर गाओ यांना आपला राजीनामा सोमवारी पाठवला. ते सोमवारपासून गुवाहाटी येथे आहेत. त्यांनी मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्यासोबत चर्चा केली. एनपीपीचे ज्येष्ठ नेत्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'जारपुम, जारकर, कुमार वाई आणि भाजपचे 12 विद्यमान आमदारांनी एनपीपी महासचिव थॉमस संगमा यांच्याशी मंगळवारी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी एनपीपीमध्ये सहभागी होण्यचा निर्णय घेतला. या नेत्यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर एनपीपी अधिकच मजबूत होईल', असा विश्वासही या नेत्याने व्यक्त केला.

असम राज्यातही भाजपला झटका

दरम्यान, असम राज्यातही भाजपला झटका देत तेजपुर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राम प्रसाद शर्मा (Ram Prasad Sharma) यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली होती. 'नव्या लोकांचा पक्ष प्रवेश करताना मूळ कार्यकर्त्यांकडे भाजपमध्ये दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या घुसमटीकडे दुर्लक्ष करता येणार नाही', असे शर्मा यांनी म्हटले होते.

उत्तर प्रदेशमध्येही भाजप खासदाराचा समाजवादी पक्षात प्रवेश

दरम्यान, या आधी उत्तर प्रदेशातून प्रयागराज येथील भाजप खासदार श्यामाचरण गुप्ता (Shyama Charan Gupta) यांनीही भाजप पक्ष सोडला होता. गुप्ता यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. समाजवादी पार्टी (Samajwadi Party) तिकीटावर ते आता निवडणुक लढणार आहेत. गुप्ता हे मुळचे समाजवादी पक्षाचेच आहेत. 1999 मध्ये त्यांनी बांदा लोकसभा मतदारसंगातून निवडणूक लढवली होती. मात्र, बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. (हेही वाचा, Lok Sabha Election 2019: रणजितसिंग मोहिते पाटील यांची भाजपा पक्ष प्रवेशाची घोषणा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उद्या प्रवेश)

उत्तराखंड राज्यात भाजपचा तगडा नेता काँग्रेसमध्ये 

दरम्यान, उत्तराखंड राज्यातही भाजपला झकटा बसला आहे. येथे भाजपचे राज्यातील ताकदवान नेते भुवन चंद्र खंडूरी (BC Khanduri) यांचे चिरंजीव मनीष खंडूरी (Manish Khanduri) यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.