'मला तिकीट द्या नाहीतर...', खा. साक्षी महाराज यांच्याकडून भाजपला गर्भित इशारा

त्यामुळे पक्षनेतृत्वाने तिकीटासाठी आपला विचार करावा. नेतृत्व आपल्यावर अन्याय करणार नाही, असे सांगत एक पत्रच साक्षी महाराज यांनी प्रदेश भाजपला लिहिले आहे. आपणास तिकीट नाकारले तर, पक्ष ओबीसींची उपेक्षा करतो असा संदेश जाईल असेही महाराजांनी म्हटले आहे.

साक्षी महाराज (Photo Credit; Facebook)

Lok Sabha Election 2019: खासदार साक्षी महाराज (Sakshi Maharaj) यांनी स्वपक्ष भाजपा (BJP) नेतृत्वाला लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) तिकीटवाटप जाहीर होण्यापूर्वीच गर्भित इशारा दिला आहे. साक्षी महाराज हे उन्नाव लोकसभा मतदारसंघातून (Unnao Lok Sabha constituency) भाजपचे प्रतिनित्व करतात. 2014 मध्ये ते सुमारे 3 लाख मतांच्या फरकाने विजयी झाले होते. मात्र, लोकसभा निवडणूक 2019 च्या उमेदवारीतून त्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. पक्षनेतृत्वाची महाराजांवर खपामर्जी असून, या निवडणूकीत त्यांचे तिकीट कापले जाणार असल्याचे समजते. दरम्यान, या वेळी आपण 2014 पेक्षाही अधिक मतांनी निवडून येऊ. त्यामुळे पक्षनेतृत्वाने तिकीटासाठी आपला विचार करावा. नेतृत्व आपल्यावर अन्याय करणार नाही, असे सांगत एक पत्रच साक्षी महाराज यांनी प्रदेश भाजपला लिहिले आहे. आपणास तिकीट नाकारले तर, पक्ष ओबीसींची उपेक्षा करतो असा संदेश जाईल असेही महाराजांनी म्हटले आहे.

प्रदेश भाजपला लिहिलेल्या पत्रात साक्षी महाराज यांनी म्हटले आहे की, उन्नाव लोकसभा मतदारसंघातून आपल्याला निवडणूक तिकीट पक्षाने दिले तर आपण पाच लाख मतांच्या फरकाने विजयी होऊ. महाराजांनी आपल्या मतदारसंघातील जातीय समिरणही पक्षनेतृत्वासमोर ठेवले आहे. या पत्रात साक्षी महाराजांनी म्हटले आहे की, पक्षावर ओबीसींची उपेक्षा केल्याचा आरोप आहे. मी ओबीसी समाजाचे नेतृत्व करतो. आणि या मतदारसंघात भाजपकडे मी सोडून दुसरा कोणताच उमेदवारीसाठी योग्य नेता नाही.

2014 मध्ये काँग्रेस आणि बसपा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. तर, समाजवादी पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. सपा-बसपा आघाडीत ही जागा समाजवादी पक्षाकडे गेली आहे. समाजवादी पक्षातून या जागेवर अरुण कुमार शुक्ला किंवा इतर कोणता तरी ब्राह्मण नेता रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, असे साक्षी महाराजांनी म्हटले आहे. याच पत्रात जातीय समिरकरण विस्ताराने मांडत साक्षी महाराज म्हणतात की, या मतदारसंघात लोधी, कहार, निषाद, कश्यप, मल्लाह समाजाचे पाचल लाख मतदार आहेत. ब्राह्मण समाजाचे मतदार 90 हजार आहेत. क्षत्रीय पन्नास हजार तर, अनुसूचित जाति आणि अनुसूचित जनचाती सहा लाख 50 हजार मतदार आहेत. मुस्लिम समाज मतदार 20 हजार आणि इतर सवर्ण मतदार आहेत. (हेही वाचा, Lok Sabha Election 2019: काँग्रेससोबत आघाडी नाही, बहुजन समाज पक्ष सर्वेसर्वा मायवतींची घोषणा)

वरील वास्तव विचारात घेता मी सोडून पक्षाकडे OBC प्रतिनिधित्व नाही. तसेही पक्षावर ओबीसींची उपेक्षा केल्याचा आरोप नेहमीच होतो आहे. जर मला तिकीट दिले नाही तर, ओबीसीची उपेक्षा होत असल्याचा पक्षावर लागलेला आरोप खरा आहे हे सिद्ध होईल. त्यामुळे माझ्या तिकीटाबाबत गांभिर्याने विचार करावा, असे साक्षी महाराजांनी म्हटले आहे. माझ्यावर अन्याय होणार नाही याची नेतृत्व काळजी घेईल असेही महाराजांनी म्हटले आहे.