Lok Sabha Election 2019: काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर
रविवारी (17 मार्च) काँग्रेस (Congress) पक्षाकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.
Lok Sabha Election 2019: येत्या आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख निवडणुक आयोगाचे काही दिवासांपूर्वी जाहीर केली होती. त्यानंतर आता प्रत्येक पक्षाकडून त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. तर रविवारी (17 मार्च) काँग्रेस (Congress) पक्षाकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीमध्ये केरळमधील 12, उत्तर प्रदेशमधील 7, छत्तीसगढ येथील 5, अरुणाचल प्रदेश मधील 2 आणि अंदमान-निकोबार येथे 1 अशा 27 जागांवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणुक लढवणार आहेत. तर शशी थरुर यांना तिरुवनंतपुरम मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अरुणाचल येथून माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांना उमेदवारी दिली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी 543 जागांसाठी सात टप्प्यामध्ये मतदान होणार असून शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी होणार आहे.(हेही वाचा-Lok Sabha Election 2019: संजय दत्त गाझियाबाद येथून उतरणार निवडणूकीच्या रिंगणात?)
ANI ट्वीट:
त्यामुळे येत्या आगामी निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाचा विजय होतो आहे आणि कोणाची सत्ता येणार हे पाहण्यासारखे असणार आहे. तसेच प्रत्येक पक्षाकडून आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून काँग्रेस पक्षाला बहुमत मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.