Lok Sabha Election 2019: भाजप VVIP उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ; नरेंद्र मोदी, अमित शाह रिंगणात
शिवाय हेमा मालिनी मथुरा येथून, संजीव कुमार बालियान मुजफ्फरपुर, सर्वेश कुमार मुरादाबाद, डॉ सत्यपाल सिंह बागपत येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
Lok Sabha Election 2019: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या 184 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत देशभरातील विविध मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान प्राप्त यादिनुसार काही नेत्यांच्या उमेदवारीमुळे संबंधीत लोकसभा मतदारसंघ हे देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यात वाराणसी लोकसभा मतदारसंघ (Varanasi Lok Sabha constituency), गांधीनगर लोकसभा मतदारसंघ (Gandhinagar Lok Sabha constituency), गाझीयाबाद मतदारसंघ यांसह अनेक मतदारसंघाचा समावेश आहे. लोकसभा निवडणूक भाजप उमेदवार पहिली यादी (Lok Sabha elections BJP candidate's first list) आणि VVIP उमेदवार पुढीलप्रमाणे.
भाजपचे हाय होल्टेज उमेदवार आणि लोकसभा मतदारसंघ
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वाराणसी लोकसभा मतदारसंघ (Varanasi Lok Sabha constituency), भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गांधीनगर लोकसभा मतदारसंघ (Gandhinagar Lok Sabha constituency), स्मृती ईरानी (Smritri Irani) या अमेठी लोकसभा मतदारसंघ (Amethi is a Lok Sabha constituency ), केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) लखनऊ लोकसभा मतदारसंघ (Lucknow Lok Sabha constituency), नितिन गडकरी (Nitin Gadkari) नागपूर लोकसभा मतदारसंघ (Nagpur Lok Sabha constituency) हे भाजपसाठी अत्यत हाय होल्टेज मतदारसंघ असणार आहे. (हेही वाचा, नागपूर लोकसभा मतदारसंघ: नितीन गडकरी यांच्या होम पिचवर नाना पटोले विजयाचा सिक्सर मारणार का? लोकसभा निवडणूक 2019 - आव्हाने आणि जमेच्या बाजू)
महाराष्ट्रातही भाजपचे मंत्री, प्रदेशाध्यक्ष रिंगणात
दरम्यान, महाराष्ट्रात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघ (Jalna Lok Sabha constituency), महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असलेले गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदारसंघ, पून महाजन या उत्तर मध्य मूंबई लोकसभा मतदारसंघातून, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हे अरुणाचल प्रदेश पश्चिम आणि जितेंद्र सिंह हे उधमपूर येथून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शिवाय हेमा मालिनी मथुरा येथून, संजीव कुमार बालियान मुजफ्फरपुर, सर्वेश कुमार मुरादाबाद, डॉ सत्यपाल सिंह बागपत येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.