26 वर्षांचा संघर्ष संपणार? भाजप आमदार अनिल गोटे यांनी घेतली शरद पवार यांची भेट

त्यामुळे गोटे पवार हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर एकत्र येणार का? याबाबत उत्सुकता आहे. शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यातील वाकयुद्ध आणि संघर्ष तेलगी प्रकरणानंतर अधिक तीव्र झाला होता.

BJP MLA Anil Gote Meet NCP Chief Sharad Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Lok Sabha Election 2019: मंत्री गिरीश महाजन, खासदार सुभाष भामरे यांचे पक्षांतर्गत विरोधक भाजप आमदार अनिल गोटे (BJP MLA Anil Gote) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आमदार गोटे आणि शरद पवार यांच्यात गेली 26 वर्षे संघर्ष आहे. दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक. मतभेद बाजूला ठेऊन आमदार अनिल गोटे हे 26 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे धुळे जिल्हा आणि राजकीय वर्तुळात चर्चेला जोरदार उधान आले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघ (Dhule Lok Sabha constituency ) या वेळी अधिक चर्चेला येण्याची शक्यता आहे. कारण, या मतदारसंघातून गोटे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

एक बंडखोर आमदार अशी अनिल गोटे यांची ओळख आहे. भाजपचे मंत्री आणि नेते गिरीश महाजन, खासदार सुभाष भामरे यांच्याशीही त्यांचा पक्षांतर्गत संघर्ष नेहमी सुरु असतो. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या धुळे महापालिका निवडणुकीतही आमदार गोटे यांनी गिरीश महाजन आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांना कडाडून विरोध केला होता. आता तर धुळे लोकसभा मतदारसंघातून गोटे यांनी लोकसभआ निवडणुक लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गोटे यांनी पक्षातच बंडाचा झेंडा उभारल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राजकारणात कोणीही कोणाचा कायमस्वरुपी मित्र किंवा शत्रू नसतो. त्यामुळे गोटे पवार हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर एकत्र येणार का? याबाबत उत्सुकता आहे. शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यातील वाकयुद्ध आणि संघर्ष तेलगी प्रकरणानंतर अधिक तीव्र झाला होता.