Loksabha Election 2019: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर सह हे ७ कलाकार आजमवणार नशीब
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून सेलेब्रिटी उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जात असून यामुळे बॉलिवूडचा राजकारणावरील प्रभाव पुन्हा चर्चेत!
2019 लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election2019) रणधुमाळीत उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर(Urmila Matondkar), पटणा साहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha), गोरखपूर मध्ये रवी किशन(Ravi kishan) या कलाकारांना उमेद्वारी घोषित झाल्यावर राजकारणावरचा बॉलीवूडचा प्रभाव हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. सर्वाधिक मतं मिळवण्याच्या स्पर्धेत राजकीय पक्ष नानाविध रणनीती आखताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये बॉलिवूडचे कलाकार, खेळाडू, तसेच बड्या व्यापाऱ्यांच्या लोकप्रियतेचा वापर करून जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा मार्ग आघाडीच्या पक्षांकडून सर्वाधिक अवलंबला जात आहे. Lok Sabha Elections 2019: भाजप पक्षाकडून 21वी उमेदवार यादी जाहीर, गोरखपुर येथून रवि किशन ह्याला तिकिट जाहीर
यंदाच्या निवणुकीत उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ठिकाणी सेलेब्रिटी उमेदवार नेमण्यात आल्याचं दिसून येत आहे. रामपूर सारख्या महत्वाच्या मतदारसंघातून 'भाजपा'कडून जया प्रदा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी जया प्रदांनी रामपूर मधूनच अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या 2004-09व 2009-14 लोकसभा सदस्यत्वाची धुरा सांभाळली होती. मात्र यंदा समाजवादी पक्षाच्या आझम खान यांच्या विरुद्ध त्या निवडणूक लढवणार आहेत.
पश्चिम बंगाल मधून देखील तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे जादवपूर मतदारसंघातून मिमी चक्रवर्ती या बंगाली अभिनेत्रीची उमेद्वार म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या उमेदवारीसाठी हार्वर्ड युनिव्हर्सिटीत प्रोफेसर म्हणून काम करणाऱ्या सुगता बोस यांचं नाव चर्चेत होतं मात्र शिक्षण संस्थातील राजकारण या विषयातील त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्याजागी मिमी हिला संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.
या सोबतच अभिनया नंतर राजकारणाकडे वळलेल्या प्रकाश राज यांनी देखील बेंगलोर मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लाडवणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर प्रकाश राज यांनी मध्य बेंगलोर मधील स्थानिकांची भेट घेतली होती.
बॉलीवूड सेलिब्रिटींच्या जोडीने टीव्ही मालिका क्षेत्रातील कलाकारांनाही राजकीय पक्षांकडून उमेदवार म्हणून पसंती दर्शवली जात होती. यामधील लोकप्रिय नाव असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यंदा राहुल गांधींच्या विरुद्ध अमेठी मधून निवडणूक लढवणार आहे.
महाराष्ट्रात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिरूर येथे अभिनेता अमोल कोल्हे तर अमरावती मधून नवनीत राणा यांची उमेदवार म्ह्णून निवड करण्यात आली आहे.
या निम्मिताने पक्षातील कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय, सेलिब्रिटींची राजकीय समज या मुद्द्यांवर सोशल मीडियावर देखील अनेक प्रश्न केले जात आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)