KV Kamath to Replace Nirmala Sitharaman as Finance Minister? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची जागा केवी कामथ घेणार? सोशल मीडियात अफवांना वेग

राजकरणात आणि सोशल मीडियात सध्या एक अफवा वेगाने पसरत आहे. त्यामध्ये असे सांगण्यात येत आहे की, प्रसिद्ध बँकर कुंदापुर वी कामथ लवकरच निर्मला सीतारमण यांची जागा घेत भारताच्या अर्थमंत्री पदाची कमान सांभाळणार आहेत. त्यामध्ये असा ही दावा करण्यात आला आहे की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना या पदावरुन हटवत त्यांच्या जागी कामथ यांना संधी मिळू शकते.

KV Kamath (Photo Credits: Twitter)

राजकरणात आणि सोशल मीडियात सध्या एक अफवा वेगाने पसरत आहे. त्यामध्ये असे सांगण्यात येत आहे की, प्रसिद्ध बँकर कुंदापुर वी कामथ लवकरच निर्मला सीतारमण यांची जागा घेत भारताच्या अर्थमंत्री पदाची कमान सांभाळणार आहेत. त्यामध्ये असा ही दावा करण्यात आला आहे की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना या पदावरुन हटवत त्यांच्या जागी कामथ यांना संधी मिळू शकते. केवी कामथ यांनी नुकतेच ब्रिक्सच्या पाच सदस्य देशांच्या नेतृत्वामधील नॅशनल डिव्हलेपमेट बँक (एनडीबी) अध्यक्षचे पद सोडले होते. त्यानंतर आता याबाबत अफवांना वेग आला आहे. केवी कामथ यांची मोदी सरकार मधील वर्णी लागण्याबाबत सरकारकडून कोणतेही विधान करण्यात करण्यात आलेले नाही.

मोदी सरकार मध्ये कामथ यांचा समावेश करण्याबद्दल एक अफवा गेल्या आठवड्यापासून वेगाने पसरत आहे. सोशल मीडियात आणि ट्वीटरवर सुद्धा युजर्सकडून याबाबत बोलले जात आहे. काही ट्वीटमध्ये युजर्सने विचारले आहे की खरंच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून पद काढून घेण्यात येणार आहे का? मात्र काही ट्वीटमध्ये म्हटले आहे की या फक्त अफवा असून असे काहीही नाही आहे.(One Nation One Ration Card: महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटकसह देशातील 20 राज्यांमध्ये एक देश एक रेशन कार्ड योजना आजपासून सुरु)

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

कोण आहेत केवी कामथ?

केवी कामथ ICICI बँकेचे अनधिकृत चेअरमॅन आहेत. 72 वर्षीय काथम यांनी इंफोसिसच्या चेअरमॅनचे पद सुद्धा सांभाळले आहे. कामथ यांचे नाव सर्वोत्कृष्ट बँकर्सच्या लिस्टमध्ये सहभागी आहे. कामथ यांनी 1971 मध्ये त्यांच्या करिअरला सुरुवात करत ICICI फायनेंशियल इंस्ट्यीट्यूशन येथून केली होती. याच संस्थेने ICICI बँकेची स्थापना केली. मात्र 2002 मध्ये ही संस्था आणि बँक यांनी विलिकरण केले.

केवी कामथ यांनी 1998 मध्ये ICICI बँकेतून राजीनामा देत एशियन डेव्हलपमेंट बँकेत सहभागी झाले. दीर्घकाळ या संस्थेसोबत काम केल्यानं त्यांनी पुन्हा 1996 मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ पद मिळवले. तर 2009 मध्ये केवी कामथ यांनी या संस्थेतून मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ पदातून निवृत्ती घेतली. त्यानंतर कामथ हे अनधिकृत चेअरमॅनची भुमिका पार पाडत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now