Jitendra Awhad on Eknath Shinde: शासन आपल्या दारी, आता ठाणेकरांची बारी, जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला,

उतिरोधक शब्दात मुख्यमंत्र्याना चांगलेत शब्द जितेंद्र आव्हाडांनी सुनवले आहे.

Jitendra Awhad on Eknath Shinde: Photo credit- FB

Jitendra Awhad on Eknath Shinde: गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह ठाण्यातही हजेरी लावली आहे. ह्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्ता तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. याच संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.  मुख्यमंत्र्यासोबत ठाणे पालिका आयुक्तांना देखील तिरस्कारव्यंजक टोला लगावला आहे.

शासन आपल्या दारी, आता ठाणेकरांची बारी, घेउन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी.....! असा उपरोधिक टोला जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ठाण्यात शनिवार पासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात २०० मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ठाण्यातील काही  ठिकाणी पाणी साचले आहे. नौपाडा, कळवा, वागळे इस्टेट, पाचपखाडी, खारकर आळी, कोपरी,  मुंब्रा आणि घोडबंदर भागात पाणी साचले आहे.  बुधवार पासून पावसाचा जोर चांगलाच झाला आहे.  ठाण्यात मुख्यमंत्रीनी नालेसफाईची पाहणी केली होती तरीही ठाण्यात पाणी तुंबत आहे असे जितेंद्र आव्हाडाने सांगितले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच ट्विट 

पहिल्या 2 दिवसाच्या पावसातच ठाण्यात पाणी तुंबले आहे.असा प्रकार ठाण्यात कधीच होत नव्हता.विशेष म्हणजे नाले सफाईची पाहणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली होती. "ठाण्यात पाणी तुंबनार,त्याकडे लक्ष द्या",अशी विनंती मी अनेक वेळा ठाणे आयुक्त यांच्याकडे केली होती.परंतु मुख्यमंत्र्यांच्या "विशेष सेवेत" दंग असणाऱ्या आयुक्तांना याकडे लक्ष देण्यास बहुदा वेळ मिळाला नसावा. आता लवकरच मुख्यमंत्री,"पाऊस आला याच कौतुक करा..ठाणे तुंबल याची तक्रार काय करता..!" सारखं स्टेटमेंट देतील,अशी मला खात्री आहे. "शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी.. घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी..!" अश्य़ा शब्दात मुख्यमंत्र्याना टोला लगावला आहे.