झारखंड विधानसभा निवडणूक 2019: काँग्रेस पक्षाकडून19 उमेदवरांची यादी जाहीर; 'या' नेत्यांना मिळाली संधी
झारखंड राज्यात 5 टप्प्यात निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) आणि हरियाणा (Hariyana) राज्यानंतर आता झारखंड (Jharkhand Assembly Election 2019) राज्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. झारखंड राज्यात 5 टप्प्यात निवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेस पक्षाने सोमवारी पाचही टप्प्यातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत आलमगीर आलम (पाकूर), डॉ. इरफान अंसारी (जामताडा), बादल पत्रलेख (जारमुंडी), दीपिका पांडे सिंह (महागामा), उमाशंकर अकेला (बरही) ,अंबा प्रसाद साहू (बडकागाव), आर. सी. प्रसाद मेहता (हजारीबाग), मंजू कुमारी (जमुआ), राजेंद्र प्रसाद सिंह (बेरमो) उम्मीदवार आहेत.
नुकतीच महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा पार पडली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील निवडणूक काँग्रेस पक्षाला अधिक जागा मिळवता आल्या नाहीत. परंतु, झारखंड येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अधिक जागा मिळवणार, असा विश्वास पक्षातील नेत्यांकडून करण्यात आला आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रात सत्ता स्थापन होणार? काँग्रेसचा पाठिंबा मिळल्याचा शिवसेना पक्षाचा दावा
एएनआयचे ट्विट-
एकूण 81 सदस्य संख्या असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यांत निवडणुका पार पडत आहेत. त्यासाठी 30 नोव्हेंबर, 7 डिसेंबर, 12 डिसेंबर आणि 20 डिसेंबर या दिवशी मतदान पार पडणार आहे. 23 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी अंतिम निकाल जाहीर केला जाईल.