मला फक्त अर्थव्यवस्थेची चिंता, पी. चिदंबरम यांनी तिहार जेलमध्ये जाण्यापूर्वी दिली प्रतिक्रिया

चिदंबरम (P. Chidambaram) यांना 19 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 14 दिवस चिदंबरम तिहार जेल (Tihar Jail) मध्ये राहणार आहे. याच परिस्थितीत तिहार जेलमध्ये जाण्यापूर्वी चिदंबरम यांनी मला फक्त आता अर्थव्यवस्थेची चिंता सतावत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Congress leader P Chidambaram. (Photo Credits: PTI)

INX मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांना 19 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 14 दिवस चिदंबरम तिहार जेल (Tihar Jail) मध्ये राहणार आहे. याच परिस्थितीत तिहार जेलमध्ये जाण्यापूर्वी चिदंबरम यांनी मला फक्त आता अर्थव्यवस्थेची चिंता सतावत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून नेहमीच सरकारवर टीका करण्यात येत आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने एप्रिल-जून या तीन महिन्याच्या कालावधीमधील GDP चे आकडे समोर आणले होते. त्यानुसार जीडीपी दर पहिल्या तीन महिन्यात 5.8 टक्के कमी होऊन 5 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच वसूल करण्यात आलेला जीएसटी कमी होऊन 98,203 लाख करोड रुपये झाला आहे.

यामुळेच विरोधकांकडून मोदी सरकारच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच मोदी सरकार आर्थिक मुद्दे आणि मंदी या सारख्या गोष्टींवर दुर्लक्ष व्हावे यासाठी काँग्रेस नेत्यांना अटक करत असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.(पी चिदंबरम यांना अटक झाली ते INX मीडिया प्रकरण नक्की आहे तरी काय? जाणून घ्या घटनाक्रम)

तिहार जेलचे प्रशासन अधिकारी यांच्या मते, चिदंबरम यांना तिहार जेलमध्ये सामान्य कैदींसारखेच ठेवण्यात येणार आहे. परंतु तिहार जेलमधील कोणत्या वॉर्डमध्ये चिदंबरम यांना ठेवण्यात यावे याबाबत कोर्टाकडून काही आदेश देण्यात आलेले नाहीत. मात्र चिदंबरम यांना 7 क्रमांकाच्या जेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या 7 क्रमांकाच्या जेलमध्ये आर्थिक गुन्हे केलेल्या व्यक्तींना ठेवण्यात येते.