ICJ Verdict On Kulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या बाजुने लागलेल्या निकालावर ट्विट करत गिरीराज सिंह यांनी उडवली 'पाकिस्तान'ची खिल्ली
तर न्यायालयाच्या काही निर्देशांचा हवाला देत पाकिस्तान (Pakistan) आपला विजय झाला असून भारताचा पराभव झाल्याची भुमिका मांडत आहे.
कुलभूषण यादव (Kulbhushan Jadhav) प्रकरणाचा निकाल बुधावारी (17 जुलै) आंतरराष्ट्रीय न्यायालयात (International Court Of Justice) जाहीर करण्यात आला. तर न्यायालयाच्या काही निर्देशांचा हवाला देत पाकिस्तान (Pakistan) आपला विजय झाला असून भारताचा पराभव झाल्याची भुमिका मांडत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सरकाने एका ट्वीटच्या माध्यमातून कुलभूषण जाधव प्रकरणी आपला मोठा विजय झाला असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत ICJ यांनी जाधव यांची सुटका करण्यासाठी भारताने केलेले मागणी धुडकावून लावली असल्याचे ही म्हटले आहे. परंतु भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी पाकिस्तानच्या सरकारने केलेल्या विधानाची खिल्ली उडवली आहे.
ICJ यांनी दिलेल्या निर्णयावर पाकिस्तान त्यांचा विजय झाला म्हणून आनंद व्यक्त करत आहे. यावरच आता गिरिराज सिंह यांनी त्यांना प्रतिउत्तर दिले आहे. सिंह यांनी असे म्हटले आहे की, पाकिस्तानची यामध्ये काही चूक नाही, कारण ICJ ने दिलेला निर्णय हा इंग्रजीत होता. त्यामुळे असे दिसून येते की पाकिस्तानचे कथित रुपात इंग्रजी वाईट असल्याने भारतीयांकडून त्यांची सोशल मीडियात खिल्ली उडवली जात असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. त्याचसोबत ICJ ने दिलेला निर्णय हा पाकिस्तानसाठी धक्कादायक आहे.(ICJ Verdict On Kulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या भविष्यावर फैसला)
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरी व दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. यावर भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेऊन हा निर्णय मागे घेत जाधव यांची सुटका करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी काल आंतरराष्ट्रीय न्यायालयात अंतिम निकाल दिला असून फाशीच्या शिक्षेवर स्थगिती लावण्यात आली आहे.