Sushilkumar Shinde on Jammu and Kashmir Visit: 'गृहमंत्री असताना काश्मीरला जायला भीती वाटायची,' सुशीलकुमार शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीर भेटींच्या सांगितल्या आठवणी
भारताचे गृहमंत्री असताना जम्मू आणि काश्मीरला भेट दिल्याच्या अनुभवांची आठवण सांगताना काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे त्यांची त्याकाळातील भीती व्यक्त केली.
Sushilkumar Shinde on Jammu and Kashmir Visit: दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये ‘फाइव्ह डिकेड्स ऑफ पॉलिटिक्स’ चे प्रकाशन करताना भारताचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde)यांनी त्यांच्या जम्मू आणि काश्मीर भेटींच्या आठवणी (Jammu and Kashmir Visit)सांगितल्या. गृहमंत्री म्हणून जेव्हा ते काश्मीरच्या लाल चौक आणि श्रीनगरमधील दल तलावाला भेट देत असत तेव्हा त्यांना भीती वाटायची असे ते म्हणाले. Jammu and Kashmir: काय होतं जम्मू-कश्मीरमधलं कलम 370, जाणून घ्या सविस्तर
त्यांचे सल्लागार असलेले शिक्षणतज्ज्ञ विजय धर यांच्या सल्ल्याने मी जम्मू आणि काश्मीरला भेटी दिली असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले. 'जम्मू आणि काश्मीरला भेटींमुळे एक चांगला संदेश देशात पसरेल असा त्या मागचा हेतू होता. माझ्या त्या दौऱ्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली त्यामुळे लोकांना मी बिनधास्त भेट देणारे गृहमंत्री आहे असे वाटत होते, परंतु प्रत्यक्षात मी घाबरायचो', असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. (Anji-Khad Bridge: जम्मु काश्मिरमधील अंजी नदीवरील भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल पूर्णत्वाकडे; अभियांत्रिकी चमत्कार आहे 'हा' पूल)
'गृहमंत्री होण्यापूर्वी मी विजय धर भेटायला गेलो होतो. मी त्यांना सल्ला विचारायचो. त्यांनी मला इकडे तिकडे न फिरता लाल चौकात (श्रीनगरमध्ये) भेट द्या, लोकांना भेटा आणि दल तलावाभोवती फिरण्याचा सल्ला दिला. त्या सल्ल्याने मला प्रसिद्धी मिळाली आणि लोकांना वाटले की इथे देशाचे गृहमंत्री बिनधास्त फिरत आहेत, मात्र, खरं तर माझी फाटायची हे कोणाला सांगू?,' असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.